शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

वसई-विरारची कामे करणार त्यालाच मते! - हितेंद्र ठाकूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2022 05:49 IST

Hitendra Thakur : ‘लोकांची आमच्याकडून अपेक्षा असते. आम्ही काय कामे केली, हे ते पाहत असतात. राज्य सरकार असो की केंद्र सरकार; आम्हाला आमच्या कामात कोण सहकार्य करेल किंवा करणार आहे, हे पाहून आम्ही आमचे मत देऊ,` असे ठाकूर यांनी सांगितले.

वसई : राज्यसभेच्या सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात उतरल्याने छोटे पक्ष तसेच अपक्षांच्या मताला मोठी किंमत आलेली आहे. तीन आमदारांचे पाठबळ असलेल्या बहुजन विकास आघाडीला यात विशेष महत्त्व आले असून, महाविकास आघाडीसह विरोधी पक्ष भाजपकडून त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, वसई-विरारची कामे करणार, त्यालाच मते मिळणार, असे बविआचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांनी स्पष्ट केले असल्याने त्यांचे पत्ते गुलदस्त्यात आहेत. ‘लोकांची आमच्याकडून अपेक्षा असते. आम्ही काय कामे केली, हे ते पाहत असतात. राज्य सरकार असो की केंद्र सरकार; आम्हाला आमच्या कामात कोण सहकार्य करेल किंवा करणार आहे, हे पाहून आम्ही आमचे मत देऊ,` असे ठाकूर यांनी सांगितले. दरम्यान, आमदार ठाकूर आणि त्यांच्या पक्षाचे अन्य दोन उमेदवार शिवसेनेसोबत जाणार की भाजपसोबत? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे.ठाकूर यांनी मात्र मला कोणत्याही पक्षाची ॲलर्जी नाही. जो पक्ष माझ्या जिल्ह्याचा, माझ्या लोकांचा विकास करेल, त्यालाच माझे मत असेल, असे सांगून या निवडणुकीतील उत्सुकता वाढविली आहे. १९९० पासून बहुजन विकास आघाडी हा पक्ष वाढविण्यात ज्यांनी योगदान दिले, ते ज्येष्ठ कार्यकर्ते आणि आम्ही तिन्ही आमदार एकत्रित बसून कुणाला सहकार्य करायचे, कुणाला मते द्यायची, यावर चर्चा करू! त्यामुळे कुणी माझी मते गृहित धरू नयेत. १० तारखेपर्यंत वेळ आहे. तोपर्यंत आम्ही निर्णय घेऊ, असे सांगून आमदार ठाकूर यांनी आपला निर्णय गुलदस्त्यात ठेवला आहे.दरम्यान, या निवडणुकीसाठी भाजप आणि मविआने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. शिवसेनेने तर आपले आमदार फुटू नये यासाठी त्यांची राहण्याची व्यवस्था हॉटेलमध्ये केली आहे. १० जूनला ही निवडणूक होणार असल्याने अपक्ष आणि छोट्या राजकीय पक्षांवर मोठ्या पक्षांनी लक्ष केंद्रीत करायला सुरूवात केली आहे. त्यांची मते आपल्याकडे कशी वळवता येतील यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे निवडणूक रंजक ठरणार आहे. 

‘ईडी’चा दबाव नाही!‘ईडी’ची भीती दाखवून आमदार हितेंद्र ठाकूर यांना भाजप आपल्या बाजूने करेल, अशी चर्चा होती. मात्र, या चर्चेलाही ठाकूर यांनी पूर्णविराम दिला आहे. ‘माझ्यावर ईडी वगैरे कुणाचा दबाव नाही. कुणावर तसा दबाव असेल तर मला माहीत नाही, पण माझ्यावर तरी अद्याप तसा दबाव नाही. भविष्यातही असे कुणी उपद्व्याप करणार नाही, याची मला खात्री आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे अशा दबावांना घाबरणारे आम्ही नाही,’ असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Hitendra Thakurहितेंद्र ठाकूरRajya Sabhaराज्यसभाVasai Virarवसई विरार