शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

प्रदूषणकारी कंपन्यांना अभय? ख- या कंपनीकडून सर्व नियम, कायदे धाब्यावर; अधिकारी झाले धृतराष्ट्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 06:52 IST

माहीमच्या दिवाण अँड सन्स औद्योगिक वसाहती मधील ड्यूरीअन कंपनीच्या मोकळ्या जागे मध्ये बेकायदेशीररित्या आपले युनिट चालवून खुले आम प्रदूषण करणा-या पालघर प्लायवूड कंपनी विरोधात तारापूर प्रदूषण मंडळाने कारवाई केली असतांना औद्योगिक सुरक्षा संचलनालय, वसई (डिश) मात्र वरील दोन्ही कंपन्यांवर कारवाई करण्यास हात आखडते घेत असल्याने या विभागाच्या कार्यप्रणालीबाबत संशय व्यक्त केला जात आहे.

- हितेन नाईकपालघर - माहीमच्या दिवाण अँड सन्स औद्योगिक वसाहती मधील ड्यूरीअन कंपनीच्या मोकळ्या जागे मध्ये बेकायदेशीररित्या आपले युनिट चालवून खुले आम प्रदूषण करणा-या पालघर प्लायवूड कंपनी विरोधात तारापूर प्रदूषण मंडळाने कारवाई केली असतांना औद्योगिक सुरक्षा संचलनालय, वसई (डिश) मात्र वरील दोन्ही कंपन्यांवर कारवाई करण्यास हात आखडते घेत असल्याने या विभागाच्या कार्यप्रणालीबाबत संशय व्यक्त केला जात आहे.पालघरच्या दिवाण अँड सन्स औद्योगिक वसाहती मधील ड्यूरीअन कंपनीने आपल्या मोकळ्या जागेत पालघर प्लायवूड कंपनीला आपले एक युनिट चालविण्यास बेकायदेशीररित्या परवानगी दिली आपले प्रदूषित पाणी छुप्या पद्धतीने नाल्यात सोडताना प्रदूषण नियंत्रण मंडळासह माहीमच्या ग्रामपंचायत सदस्यांनी रंगेहात तिला पकडले होते. यावेळी तारापूर प्रदूषण मंडळाचे क्षेत्रीय अधिकारी लाटे यांनी पालघर प्लायवूडच्या मूळ कंपनीवर कारवाई करणे अपेक्षित असतांना बेकायदेशीररित्या ड्युरीअन कंपनीच्या मोकळ्या जागेत प्लांट उभारलेल्या व बोगसपणे उभारलेल्या पालघर प्लायवूड कंपनीचे उत्पादन बंद करण्यात आल्याचे कागदोपत्री दाखवून मूळ प्लायवूड कंपनीला अभय दिले. सोयीस्कररित्या प्रशासनाच्या डोळ्यात धूळ फेकण्याचे काम तारापूरच्या प्रदूषण नियंत्रण मंडळीच्या अधिकाºयाने केले आहे. अशा कारवाईमुळे प्रदूषण करणाºया कंपनी मालकाचे चांगलेच फावणार असून बोगस कंपन्या उघडण्याच्या आणि त्याद्वारे बिनधास्तपणे प्रदूषण करण्याच्या अपप्रवृत्तीला चालना मिळणार आहे.तारापूर प्रदूषण नियंत्रण मंडळाने दि. १५ डिसेंबर २०१७ रोजी धाड घातल्यानंतर दि. १० जानेवारी २०१८ रोजी बोगस उभारलेल्या पालघर प्लायवूड लिमिटेड कंपनीचे उत्पादन बंद (क्लोजर) ची कारवाईचे केली. यावेळी वसई डिश विभागाच्या निद्रिस्त अधिकाºयांना या प्रकरणाबाबत कुठलीही कल्पना नसल्याने हा विभाग किती कार्यक्षम आहे हे दिसून आले. त्यामुळे या दोन्ही दोषी कंपनीवर कारवाई करण्यात यावी यासाठी वसईच्या डिश विभागाकडे तक्रार करण्यात आली. त्या तक्रारीच्या अनुषंगाने जागे झालेल्या डिश कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी नितीन गजपुरे यांनी दि.८ जानेवारी रोजी २०१८ ड्युरीअन कंपनी ला भेट दिली. ह्यावेळी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर आपण कडक कारवाई करणार असल्याचे सांगणाºया गजपुरे ह्यांची घोषणा ड्युरीअन च्या कार्यालयाच्या अधिकाºयांना दिलेल्या भेटी नंतर अल्पावधीतच हवेत विरल्याचे दिसले. घटनास्थळी कंपनीचे कुठलेही अस्तित्व नसल्याने किंवा ही कंपनी सुरू नसल्याने आम्ही कारवाई करू शकत नाही, असे उत्तर गजपुरेनी यावेळी उपस्थित तक्रारकर्त्यांना दिली. प्रदूषण मंडळाने कुठलीही परवानगी न घेता कंपनी चालू करणे, प्रदूषित रसायन बाहेर फेकणे, रसायनांचा बेकायदेशीर साठा बाळगणे, माहीम ग्रामपंचायत आदी तत्सम विभागाच्या कुठल्याही परवानग्या नसणे आदी बाबत लेखी कागदोपत्री पुरावे आपल्या वरिष्ठांना सादर करून कंपनी क्लोजरची कारवाई प्रदूषण नियंत्रण मंडळ, तारापूर विभागाने केली असताना डिश विभाग त्याच कागदपत्रांच्या आधारे दोन्ही कंपन्यांवर कारवाई का करीत नाही? असा प्रश्न तक्रारकर्त्यांनी उपस्थित केला आणि फौजदारी कारवाई ची मागणी केली असता अशी कारवाई करण्या संदर्भात आम्ही काहीही करू शकत नसल्याचे सांगून अधिकारी फक्त हात झटकण्याचे काम करीत आहेत. या दोन्ही कंपन्यांना वाचविण्यासाठी राजकीय ताकद वापरली जात असल्याने बेकायदेशीर आणि प्रदूषणकर्त्या कंपन्यांचे फावणार असून भविष्यात परिसरातील प्रदूषणाचे प्रमाण वाढत जाणार आहे.हरित लवादाकडे धावप्रदूषण मंडळ आणि तत्सम विभागाच्या परवानग्या न घेता कंपनी सुरू करण्यात आली असेल तर फौजदारी गुन्हा दाखल करता येऊ शकतो. किंवा हरित लवाद किंवा न्यायालयात याचिका दाखल करता येऊ शकते.- अ‍ॅड. प्रवर्तक पाठक,पर्यावरण विषयक वकीलसर्वसामान्यांनी तक्र ार केल्या नंतरच प्रदूषण मंडळ कारवाई करते. त्या विभागाच्या भरारी पथकाने अशा बेकायदेशीर व प्रदूषण करणाºया कंपन्यांना आळा घालायला हवा. मात्र असे होताना दिसत नसल्याने जिल्ह्यात प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे.-मनीष संखे,पर्यावरण दक्षता मंच

टॅग्स :Vasai Virarवसई विरार