शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दिनेश भट यांच्या प्रेरणेतून सलग तिस-या वर्षी जव्हारला अबव्ह फोर्टी फेस्टिव्हल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 03:20 IST

जव्हार : माजी नगराध्यक्ष दिनेश भट यांच्या प्रेरणेतून सलग तिसºया वर्षी अबव्ह फोर्टी फेस्टीव्हल २७, २८ व २९ आॅक्टोबर राजीव गांधी क्रीडा संकुलात आयोजण्यात आला आहे.

हुसेन मेमनजव्हार : माजी नगराध्यक्ष दिनेश भट यांच्या प्रेरणेतून सलग तिस-या वर्षी अबव्ह फोर्टी फेस्टीव्हल २७, २८ व २९ आॅक्टोबर राजीव गांधी क्रीडा संकुलात आयोजण्यात आला आहे. जव्हार तालुक्यातील चाळीस वर्षांवरील क्रिकेट खेळाडूंचे पाच संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. यावर्षी हा फेस्टीव्हल तीन दिवस व दोन रात्री असा होणार आहे.या दरम्यान दिवसा क्रिकेटचे सामने व रात्री सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. आयोजकांनी निवडलेल्या क्रिकेटच्या पाच संघांना जव्हार संस्थान काळात होऊन गेलेल्या राजे, महाराजांची नावे देण्यास आलेली आहेत. त्यात प्रामुख्याने जव्हार संस्थान काळातील सर्वात जास्त लोकप्रिय राजे यशवंतराव मुकणे यांच्या नावाने असलेल्या यशवंत वॉरीयर्स या संघात एकूण १७ खेळाडू असतील व या संघाचे नेतृत्व जव्हार मधील मोर्चा संघाचे माजी कर्णधार सलीम मुल्ला करणार आहेत.या फेस्टीव्हल दरम्यान दोन रात्री सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमात या फेस्टिव्हलमध्ये सहभागी झालेले एकूण ९० च्या वर खेळाडू आपआपली कला सादर करणार आहेत.हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी जव्हारमधील अनिल तमोर, फिरोज शेख, इरफान शेख, नदीम चाबुकस्वार, अभिजित मुकणे, मनोज प्रभू, सचिन अंभीरे, मनीष घोलप तसेच हर्षद मेघपुरिया यांनी विशेष मेहनत घेतली आहे. या फेस्टीव्हल साठी जव्हार तालुक्यातील सर्वच स्तरातील नागरिकांनी सहकार्य केले आहेत. महोत्सवाच्या आयोजनासाठी शहरातील मान्यवर तसेच तरुणाई आणि विविध क्षेत्रातील प्रमुख व्यक्ती मेहनत घेत आहेत.>संस्थानच्या राजे-महाराजांची संघांना नावेंसंस्थान काळातील १७०० व्या शतकातील राजे देवबा यांच्या नावाने साकारलेल्या देवबाज चॅलेंजर्स संघाचे नेतृत्व नॅशनल संघाचे खेळाडू फिरोज शेख करणार आहेत. तसेच संस्थान काळातील कर्तृत्ववान राजे जयबा यांच्या नावाच्या जायबा फायटर या संघाचे नेतृत्व दर्यासारंग संघाचे खेळाडू मनोज प्रभू हे करणार आहेत. त्याच प्रमाणे संस्थान काळातील हुशार व लोकप्रिय राजे मल्हारराव मुकणे यांच्या नावाचाही मल्हार ब्लास्टर हा संघ असेल व त्याचे नेतृत्व दर्या सारंग संघाचे धडाकेबाज खेळाडू सचिन अंभीरे करतील. तसेच या स्पर्धेत पाचवा संघ जव्हार संस्थान काळातील महाराज मार्तंडराव मुकणे यांच्या नावाचा असेल व त्याचे नेतृत्व मोर्चा संघाचे माजी कर्णधार इरफान शेख हे करणार आहेत. या स्पर्धे करिता या वर्षी ३५ वर्षा वरील खेळाडूंनाही संधी देण्यात आलेली आहे. या स्पर्धेत विजेत्या व उपविजेत्या संघास चषक व रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. या स्पर्धेबद्दल संपूर्ण जिल्ह्यात मोठी उत्सुकता दिसून येते आहे.