शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

अबिटघर गाव घातक प्रदुषणाच्या विळख्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 03:19 IST

तालुक्यातील आबिटघर गावात मोठया प्रमाणावर औद्योगिक कारखाने असून यातील काही कारखान्यांनी पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवले आहेत. सायंकाळनंतर पहाटेपर्यंत या भागात धुके पडावे असा प्रदुषणाचा विळखा असतो.

- वसंत भोईरवाडा : तालुक्यातील आबिटघर गावात मोठया प्रमाणावर औद्योगिक कारखाने असून यातील काही कारखान्यांनी पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवले आहेत. सायंकाळनंतर पहाटेपर्यंत या भागात धुके पडावे असा प्रदुषणाचा विळखा असतो. गावालगतचा ओहळ या रासायनिक प्रदुषणाचा शिकार बनला असून या विरोधात ग्रामपंचायत ब्र काढायला सुद्धा तयार नाही. काहींचे आर्थिक हितसंबध या कंपन्यांशी गुंतल्यामुळे संपुर्ण गाव वेठीशी धरण्यात आले आहे. दरम्यान, प्रदुषीत पाणी प्यायल्याने शेतकºयांची गुरे अनेक जनावरे दगावल्याचे स्थानिक आदिवासींचे म्हणने आहे.या गावामध्ये विविध वस्तूंचे उत्पादन होत असल्याने काही घरांना आर्थित सुबत्ता आली असली तरी सामान्य जनतेला प्रदुषणाचा मारा सहन करावा लागतो आहे. येथील सनशाईन पॅपटेक प्रा. लि., ग्रिनटेक मेटल रिसायकल्स् प्रा.लि., जय जगदंबा, शक्ती मेटल, मे. प्लस ल्युब्रिकेट्स या पेपर, स्टिल, रोलींग हिगोट व आईल फिल्टरचे उत्पादन घेणाºया कारखान्यांमधून मोठ्या प्रमाणावर घातक रासायनिक सांडपाणी लगतलच्या नाल्यामध्य व शेतामध्ये सोडल्याने लगतच्या नाल्यातील पाणी दुषित झाले असून त्याचा प्ररिणाम जमिनीचा पोत व भूगर्भातील जलावर झाला आहे.या कंपन्यांविरोधामध्ये ग्रामपंचायतीकडे मोठ्याप्रमाणामध्ये तक्रारी झाल्या आहेत. नाल्यातील प्रदुषीत पाणी प्यायल्याने अनेक जनावरे दगावल्याचे या कंपन्यालगत राहणाºया आदिवासी कुटुंबांचे म्हणणे आहे. या कंपन्या अनेकदा कामगार कायद्याची पायमल्ली करतात. त्यामुळे या कंपन्या व व्यवस्थापक यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात यावी अशी मागणी येथील स्थानिक सामाजिक कार्यकर्ते विश्वास पाटील यांनी जिल्हाधिकारी पालघर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान या कारखान्यांविरोधात येत्या १५ फेब्रुवारीरोजी असलेल्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, या संदर्भात प्रदुषणाची तक्रार असणाºया सनशाईन पेप टेक या कंपनीचे व्यवस्थापक राहुल फणसे यांना विचारले असता मालकांकडे बोट दाखवून माहिती देण्याचे नाकारले.या संदर्भात गावकरी वंदना खाले यांनी या कारखान्यांच्या प्रदुषणा विरोधात चांगलाच रोष व्यक्त केला. यापूर्वी आम्ही या नाल्याचे पाणी पीत होता. मात्र कंपन्यांनी सोडलेल्या सांडपाण्यामुळे संपूर्ण पाणी दुषित झाले आहे. शिवाय दिवासातून तीन-चार वेळा सोडल्या जाणाºया धुरामुळे आम्हाला श्वास घ्यायलाही त्रास होत असल्याचे त्यांनी सांगितले. चिंतामण खाले म्हणाले की, या कंपन्यांच्या प्रदुषणाचा खूप त्रास होत असून नाल्याचे पाणीही दुषित झाले आहे. रात्री लहान मुलांना श्वसनास त्रास होत असल्याने ते घाबरुन उठतात असे लोकमतशी बोलतांना सांगितले. त्याच प्रमाणे अबिटघर ग्रामपंचातीचे ग्रामसेवक दिपक पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ग्रामसभेने या कारखान्यांच्या माध्यमातून विविध रोजागाराच्या संधी स्थानिकांना मिळत असल्याने कारखान्याचे बाजूने ठराव घेतल्याची कबूली दिली.कारखानदारांच्या मॅनेजमेंटपुढे ; ग्रामपंचायतही झाली हतबलया कारखान्यांमध्ये ज्या स्थानिक लोकांचे व्यावसायिक हितसंबध गुतले आहेत. त्याना हाताशी धरून कंपनी मालकांनी हा गंभीर प्रकार दाबण्याचा प्रयत्न चालवला आहे.त्यातच २०१७ मध्ये नाव्याने निवडून आलेल्या ग्रामपंचायत कार्यकारणीही या घातक प्रदुषणाकडे कानाडोळा करत असून कंपनी मालकांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी ग्रामपंचातीने थेट ग्रामसभेच्या माध्यमातून प्रदुषण होत नसल्याचा सूर लावला आहे.वास्तवीक ग्रामपंचायतीकडे प्रदुषणा संदर्भात ठाम मत मांडण्यासाठी कोणतीही यंत्रणा नाही. त्यामुळे कोणतेही तांत्रिक सहाय्य नसतांना त्यांनी या कारखान्यांना क्लीनचिट देणे म्हणजेच कारखानदारांची मॅनेजमेंट आणि ग्रामपंचायत प्रशासनाची हतबलता आहे का असा सवाल ग्रामस्थ विचारत आहेत.जिल्हाधिकाºयांचे चौकशीचे आदेशग्रामपंचायत व नागरिकांनी केलल्या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकाºयांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. या संदर्भात वाडयातील उपविभागीय अधिकाºयांनी संबंधीत कारखान्यांना नियम १३३ प्रमाणे नोटीस बजावून दोन वेळा सुनावनी घेतली आहे. त्यामुळे प्रदूषणकारी कंपन्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. संबंधित कंपन्याचा मुजोरीपणा मनमानी कारभार वेळीच थाबवला गेला नाही तर कठोर कारवाई केली जाईल असे संकेत वाडा उपविभागीय अधिकारी मोहन नळनकर यांनी यांनी दिले आहेत.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार