शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

बनावट धनादेश व कागदपत्रांच्या द्वारे फसवणूक करणाऱ्या अट्टल भामट्याला अटक

By धीरज परब | Updated: November 14, 2023 19:38 IST

बनावट धनादेश द्वारे बँक व्यवस्थापक यांनाच ११ लाख ९२ हजार रुपयांना फसवणाऱ्या सराईत भामट्याला मीरा भाईंदर - वसई विरार पोलिसांच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेने अटक केली आहे.

मीरारोड - बनावट धनादेश द्वारे बँक व्यवस्थापक यांनाच ११ लाख ९२ हजार रुपयांना फसवणाऱ्या सराईत भामट्याला मीरा भाईंदर - वसई विरार पोलिसांच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेने अटक केली आहे.  गेल्या तीन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या ह्या आरोपीवर ठाणे, मुंबई, नागपूर सह मीरारोड, वसई - विरार भागात ९ गुन्हे दाखल आहेत. बनावट कागदपत्रां द्वारे आरोपी व त्याच्या साथीदारांनी मिळून पतपेढी, बँक, फायनान्स कंपनीना काही कोटींचा गंडा घातला आहे. 

मीरारोडच्या डिसीबी बँकेच्या व्यवस्थापक जया विनोद बजाला यांच्या फिर्यादी वरून दाखल गुन्ह्यात दुबे याने  ३ बनावट धनादेश बनवून ते वेगवेगळया बँक खात्यामध्ये डिपॉझिट केले. नंतर दुसऱ्या बँकेत ती रक्कम वळती करून काढून घेत बँकेची ११ लाख ९२ हजार ५००रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी मीरारोड पोलिस ठाण्यात मार्च २०२० मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 गुन्हयाच्या तपासात आरोपीचे नाव सुशिल अंबीकाप्रसाद दुबे (४५) असल्याचे निष्पन्न झाले मात्र दुबे हा सतत वास्तव्य बदलत असल्याने तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता. गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती गुन्हे प्रकटिकरण कक्षचे पोलिस उपनिरीक्षक हितेंद्र विचारे यांना तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदार मार्फत दुबे याची माहिती मिळाली. 

गुन्हे शाखेचे उपायुक्त अविनाश  अंबुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल राख,  निरीक्षक हितेंद्र विचारे सह श्रीमंत जेधे, संग्राम गायकवाड, राजाराम काळे, प्रविणराज पवार, आसिफ मुल्ला यांच्या पथकाने मीरारोडच्या कनकिया येथील तिवारी कॉलेज भागात  सापळा रचून दुबे ह्याला ११ नोव्हेंबर रोजी शिताफीने ताब्यात घेतले. दुबे हा भाईंदर पूर्व येथील चित्तोडगड इमारतीत राहणारा आहे. 

 अर्नाळा पोलिस ठाण्यात उज्जीवन स्मॉल फायनान्स ला बनावट कागदपत्रांनी गृहकर्ज घेऊन २८ लाखाना  तर वालीव पोलिस ठाण्यात  माणिकपूर अर्बन क्रेडिट सोसायटीची १ कोटीची साथीदारां सोबत मिळून फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात आरोपी आहे. तसेच नालासोपारा पोलीस ठाणे हद्दीत सुद्धा फसवल्याचे  दाखल गुन्ह्यात दुबे हा पोलिसांना सापडत नव्हता. शिवाय त्याच्यावर २००४ पासून मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नागपूर भागात गुन्हे दाखल असून त्यात त्याला अटक झाली होती. नागपूर येथील गुन्ह्यात १५ दिवसां पूर्वीच तो सुटून आला होता.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारCrime Newsगुन्हेगारीArrestअटकmira roadमीरा रोड