शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

मीरा भाईंदरच्या मैदाने व उद्यानांत तयार होणार 'हिरकणी कक्ष' आणि ग्रंथालय  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2023 15:04 IST

नोकरी , शिक्षण आदी विविध कामा निमित्त मुली , तरुणी , विद्यार्थिनी  , महिला ह्या घरा बाहेर पडत असतात . परंतु सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी चांगले स्वच्छ असे स्वच्छतागृह अभावानेच उपलब्ध होते .

लोकमत न्यूज नेटवर्क

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या मैदाने व उद्यानांत महिलांसाठी हिरकणी कक्ष तसेच नागरिकांसाठी ग्रंथालय होणार आहे . हिरकणी कक्षा साठी २० कोटींचा खर्च असून कामाचे कार्यादेश देण्यात आले आहेत . या शिवाय सार्वजनिक ठिकाणी मोकळी जागा उपलब्ध असले त्याठिकाणी देखील हिरकणी कक्ष उभारण्याचे प्रस्तावित आहे.  

नोकरी , शिक्षण आदी विविध कामा निमित्त मुली , तरुणी , विद्यार्थिनी  , महिला ह्या घरा बाहेर पडत असतात . परंतु सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी चांगले स्वच्छ असे स्वच्छतागृह अभावानेच उपलब्ध होते . शिवाय लहान बाळ असलेल्या मातांना स्तनपान साठी योग्य अशी जागा उपलब्ध नसते . महिलांची होणारी कुचंबणा पाहता त्यांना आवश्यक दर्जेदार सुविधा मिळावी यासाठी आमदार प्रताप सरनाईक यांनी शासना कडे हिरकणी कक्ष उभारण्याची संकल्पना मांडत निधीची मागणी केली होती . आ . सरनाईक यांच्या पाठपुराव्याने शासनाने २० कोटींचा निधी मंजूर केला असून पालिकेने सदर कामाचे कार्यादेश देखील ठेकेदारास देण्यात आले आहेत . जून महिन्यातच सदर कामांना सुरवात होणार असून येत्या ६ ते ८ महिन्यात हिरकणी कक्ष बांधून होतील अशी शक्यता आहे . 

आ . सरनाईक यांच्या मतदारसंघात मीरा भाईंदर महापालिकेच्या येणाऱ्या मैदाने व उद्यानात हिरकणी कक्ष उभारले जाणार आहेत . या हिरकणी कक्षात वातानुकूलित स्वछतागृह, स्तनपान कक्ष, सॅनिटरी पॅड्स व सॅनिटायझर वितरक यंत्र, स्वयंचलित फ्लशिंग यंत्र इत्यादी सोयी-सुविधा असणार आहे.  आकर्षक आणि आधुनिक पद्धतीने हिरकणी कक्ष बांधले जातील . यामुळे मुली , तरुणी, महिला व स्तनदा मातांना चांगली दिलासादायक सुविधा उपलब्ध होणार आहे . मैदाने - उद्याने याशिवाय शहरातील वर्दळीच्या ठिकाणीही हिरकणी कक्ष तयार करण्यासाठी जागा शोधाव्यात असे या . सरनाईक यांनी महापालिकेस सांगितले आहे . 

ओपन लायब्ररीही होणार - शहरातील उद्याने व मैदानात ग्रंथालय उभारण्याचा कामांचे कार्यादेश पालिकेने दिले आहेत . उद्यान - मैदानात केवळ विरंगुळाच नव्हे तर पुस्तक वाचनाचा आनंद देखील साहित्य व वाचनप्रिय नागरिकांना मोफत घेता येणार आहे . हे ग्रंथालय देखील आकर्षक स्वरूपात असणार आहेत. आजच्या काळात पुस्तके वाचण्याचे प्रमाण मोबाईल आदी मुळे कमी होत आहे . वाचन संस्कृती वाढावी व चांगल्या दर्जेदार पुस्तकांचे वाचन धकाधकीच्या जीवनात निसर्गरम्य ठिकाणी करता यावे यासाठी मैदान - उद्यानात ग्रंथालय उभारणीचा निर्णय आ . सरनाईक यांनी मंजूर करून घेतला आहे . हि खुली ग्रंथालये ज्ञानात वाढ  करण्यासह विद्यार्थी , वाचनप्रेमी , तरुण आदींच्या हिताची ठरेल अशी खात्री आ . सरनाईक यांनी व्यक्त केली आहे

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर