शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

भाईंदर मधील धोकादायक फटाका विक्री स्टॉलवर गुन्हा दाखल 

By धीरज परब | Updated: October 26, 2022 14:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क  मिरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या अग्निशमन दलाने मंगळवारी भाईंदर येथील एका फटाके स्टॉलचा माल जप्त करत ...

लोकमत न्यूज नेटवर्क मिरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या अग्निशमन दलाने मंगळवारी भाईंदर येथील एका फटाके स्टॉलचा माल जप्त करत गुन्हा दाखल केला आहे. 

भाईंदर पूर्वेच्या इंद्रलोक नाका येथे स्व . प्रफुल्ल पाटील चौक भागात स्वामी समर्थ फायर वर्क्स ला अग्निशमन दलाने १४ ऑक्टोबर रोजी फटाका स्टॉल साठी नाहरकत दाखला दिला होता. परंतु सदर स्टॉल प्रकरणी तक्रारी आल्यावर मंगळवारी अग्निशमन दलाने स्थळ पाहणी केली असता विक्रेत्याने फटाका स्टॉल मंजुरीच्या बाहेर जाऊन चक्क महापालिकेच्या पदपथ वर आणला होता . त्यामुळे मुख्य रस्त्यावरून रहदारी करणाऱ्या लोकांच्या जीवास धोका निर्माण झाला . 

विक्रेत्याने अटीशर्तींचे उल्लंघन केल्याने अग्निशमन दलाने परवाना रद्द करत त्याचा माल जप्त करण्याची कार्यवाही केली .  त्या नंतर अग्निशमन केंद्र अधिकारी दिलीप रणावरे यांच्या फिर्यादी वरून फटाका स्टॉल मधील विक्रेते सेल्वराज षणमुगम व जितेंद्र गडकर ह्या दोघांवर नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . 

फटाका विक्रेता आरोपी आहे याचिकाकर्ता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मीरा भाईंदर महापालिका आयुक्त दिलीप ढोले आदीं विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणारा सेल्वराज षणमुगम हा भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांचा कार्यकर्ता म्हणून ओळखला जातो . सेल्वराज हा अटीशर्तींचे उल्लंघन करून लोकांच्या जीवितास धोका होईल या पद्धतीने फटाके विक्री करत होता म्हणून त्याच्यावर अग्निशमन दलाने गुन्हा दाखल केल्याने  सेल्वराज याची अडचण वाढण्याची शक्यता आहे .

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर