शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ८७ टक्के लसीकरण, टार्गेटच्या दिशेने आशादायक वाटचाल; कोरोनायोद्ध्यांचा विश्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2021 01:03 IST

सध्या पालघर जिल्हा एक ते तीन क्रमांकादरम्यान असून आरोग्य विभागाने दिलेले टार्गेट पूर्ण करण्याच्या दिशेने आशादायक वाटचाल सुरू आहे.

हितेन नाईकपालघर : पालघर जिल्ह्यातील आठ तालुक्यांतील ५ हजार ६०० टार्गेटपैकी ४ हजार ८२७ लसी देण्यात आल्या आहेत. यामुळे जिल्ह्यात ८७ टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.

पालघर जिल्ह्यात आतापर्यंत ४५ हजारांहून अधिक लोक कोरोनामुळे बाधित ठरलेले आहेत. या जीवघेण्या आजारात एक हजार १९७ जणांना आपले प्राण गमवावे लागले. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मध्यंतरी मोठी चिंता व्यक्त होत होती. मात्र, आता जिल्ह्यात कोरोना बऱ्यापैकी नियंत्रणात आलेला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील आरोग्यसेवेतील कोरोनायोद्ध्यांना अगोदर लसीकरण केले जात आहे.शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार, लसीकरण केले जात असून आतापर्यंत ४ हजार ८२७ जणांचे कोरोना लसीकरण झाले आहे.

राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत पालघर जिल्हा पहिल्या पाच क्रमांकांमध्ये आहे. आरोग्यसेवकांना, डाॅक्टर्स तसेच अन्य कोरोनायोद्ध्यांनी प्रशासनावर विश्वास ठेवून लसीकरण करून घेतल्यामुळे एवढे चांगले यश मिळाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.कोरोना लसीकरणाच्या सुरुवातीच्या काळापासून पालघर जिल्ह्यातील जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल थोरात, डॉ. केळकर आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सूर्यवंशी, डॉ. सागर पाटील, डॉ. मिलिंद चव्हाण आदी अधिकाऱ्यांनी नियोजनपूर्वक काम करून राज्यात प्रथम क्रमांक मिळविला होता. सध्या पालघर जिल्हा एक ते तीन क्रमांकादरम्यान असून आरोग्य विभागाने दिलेले टार्गेट पूर्ण करण्याच्या दिशेने आशादायक वाटचाल सुरू आहे.

जिल्ह्यात समाधानकारक काम सुरूसध्या जिल्ह्यात समाधानकरीत्या काम सुरू आहे. लसीकरणाबाबत कुठूनही नकार नाही. लसीकरणादरम्यान ताप येणे अशा किरकोळ इन्फेक्शनव्यतिरिक्त कुठलीही बाधा झालेली नाही.-  डॉ. दयानंद सूर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी

३३ हजार डोस प्राप्त१६ जानेवारी रोजी लसीकरणाच्या सुरुवातीला जिल्ह्याला १९ हजार ५०० डोसचा साठा मिळाला होता. दुसरा १३ हजार ३०० डोसचा साठा प्राप्त झाला आहे. एकूण ३३ हजार डोस प्राप्त झाले आहेत.

लसीकरणात महिला ६० टक्केआरोग्यसेवेतील नर्स आणि सिस्टर आदी महिलांचे प्रमाण आरोग्यसेवेत जास्त असल्याने ६० टक्के महिलांचे लसीकरण झालेले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस