शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

आंदोलनाला यश ! अखेर 711 रुग्णालयात पालिकेचा स्वतंत्र दवाखाना सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2019 17:38 IST

पालिकेच्या आरक्षणात बांधलेल्या भाईंदरच्या ७११ रुग्णालयातील पालिकेचा दवाखाना अखेर शनिवारी (19 जानेवारी) सकाळपासून सुरू करण्यात आलाय.

मीरा रोड - पालिकेच्या आरक्षणात बांधलेल्या भाईंदरच्या ७११ रुग्णालयातील पालिकेचा दवाखाना अखेर शनिवारी (19 जानेवारी) सकाळपासून सुरू करण्यात आलाय. त्यामुळे तब्बल १४ दिवसांपासून दवाखाना सुरू व्हावा म्हणून साखळी उपोषणास बसलेल्या जिद्दी मराठा प्रतिष्ठान आणि सत्यकाम फाऊंडेशनने आंदोलन मागे घेतले. तब्बल सहा वर्षांनी नागरिकांना पालिकेचा हक्काचा दवाखाना मिळाला आहे. पहिल्या दिवशी ४० जणांनी वैद्यकिय सुविधेचा लाभ घेतला. या आंदोलनामुळे पालिका आयुक्तांसह भाजपा आमदार, महापौरांवर टीकेची झोड उठली होती.भाजपा आमदार नरेंद्र मेहता, महापौर डिंपल मेहता यांच्या संबंधितांच्या ७११ कंपनीने सेव्हन स्क्वेअर शाळेसमोर पालिका आरक्षणात बांधलेल्या रुग्णालयातील दोन मजली भाग महापालिकेला बांधून द्यायचा होता. परंतु २०१३ पासुन ७११ रुग्णालय सुरू केले पण पालिकेला जागा न दिल्याने दवाखाना व प्रसुतीगृह सुरु झाले नव्हते. या विरोधात आंदोलन व लोकायुक्तांकडे तक्रारी नंतर गेल्या ऑगस्टमध्ये जागा पालिकेला हस्तांतरीत झाली. पण दवाखाना, प्रसुतीगृह मात्र सुरु केले जात नव्हते.६ जानेवारी पासुन संस्थेचे प्रदीप जंगम सह सत्यकामचे कृष्णा गुप्ता आदींनी पालिके बाहेर साखळी उपोषण सुरू केले. त्याला शिवसेना, काँग्रेस, श्रमजीवी संघटना, बविआ, कम्युनिस्ट, जनता दल (से.), समाजवादी पार्टी, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस पाटी, भाजपाच्या माजी महापौर गीता जैन सह संस्था व नागरीकांनी पाठींबा दिला. सोशल मीडियासह आंदोलन सतत उग्र बनत गेलं.१४ जानेवारी रोजी दवाखाना सुरू करण्याचे पालिकेने लेखी दिलेले आश्वासन सुद्धा सत्ताधा-यांच्या दबावाखाली सुरु केले गेले नाही. तर ७११ कं. कडून अंतर्गत लाद्या, रंगकाम, वायरींग तसेच स्वच्छता गृहाचे कामच पालिकेने करुन घेतले नसल्याचे उघड झाले.

दुसरीकडे आंदोलनामुळे आयुक्तांसह सत्ताधारी भाजपा, आमदार, महापौरांवर मोठ्या प्रमाणात टीकेची झोड उठू लागली. अखेर शनिवारी सकाळी तळमजल्यावर लाकडी पार्टिशन टाकून पालिकेने दवाखाना सुरु केला. पालिकेने दवाखाना सुरु केल्याने आंदोलकांसह समर्थक नागरीकांनी दवाखान्यात जाऊन पालिकेची पावती फाडत वैद्यकिय तपासणी करुन घेतली. त्या नंतर आंदोलन मागे घेण्यात आले.पालिकेचा दवाखाना सुरु झाल्याने भाईंदर पूर्वेच्या इंद्रलोक, रामदेव पार्क, क्विन्स पार्क, कनकिया आदी भागातील लोकांना नाममात्र शुल्कात बाह्योपचारची तसेच लसीकरणाची सुविधा मिळणार आहे. तर येथे पालिकेचा फलक लावण्यात आला असून वेळ आदी माहितीचा फलक सुद्धा लावला जाणार आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल