शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

५४ बालके कुपोषणाच्या विळख्यात

By admin | Updated: January 9, 2016 01:55 IST

जव्हार तालुक्यातील अतिदुर्गम व अविकसित भाग म्हणून गावाची ओळख असणाऱ्या वावर-वांगणी येथे सन-१९९२-९३ मध्ये कुपोषणाने जवळपास ५१ बालकांचा मृत्यू झाला होता.

हुसेन मेमन, जव्हारजव्हार तालुक्यातील अतिदुर्गम व अविकसित भाग म्हणून गावाची ओळख असणाऱ्या वावर-वांगणी येथे सन-१९९२-९३ मध्ये कुपोषणाने जवळपास ५१ बालकांचा मृत्यू झाला होता. तर, शेकडो बालके कुपोषणाच्या विळख्यात अडकले होते. मात्र, आजही येथील कुपोषणाचा विळखा कायम असून तीव्र कुपोषित बालके ३१ व अतितीव्र कुपोषित बालके २३ अशी एकूण ५४ बालकेही या गावात कुपोषणाच्या विळख्यात अडकली आहेत. एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प-१ व बालविकास सेवा योजना प्रकल्प साखरशेत-२ असे जव्हार तालुक्यात दोन बालविकास प्रकल्प असून साखरशेत-२ या प्रकल्पात वावर-वांगणी हे गाव मोडत आहे. तर, शासनाच्या आकडेवारीनुसार साखरशेत बालविकास प्रकल्पात तीव्र कुपोषित बालके ४८३ व अतितीव्र बालके ७७ अशी एकूण- ५६० बालके कुपोषित आहेत. सन-२०१५ मध्ये गेल्या वर्षभरात १ ते ६ वर्षे वयातील एकूण-१३ बालकांचा मृत्यू झाला आहे. तर, यामध्ये ५ बालकांचा मृत्यू हा कुपोषणामुळे झाल्याची आकडेवारी आहे. उर्वरित बालकांचा मृत्यू हा वेगवेगळ्या कारणाने झाला आहे.अजूनही एसटी नाही...जव्हारहून वावर-वांगणी हे गाव ३५ किमी असून या गावपाड्यांना जाण्यासाठी दोन बाजूने रस्ते आहेत. मात्र, तेही अपूर्ण व खराब तसेच व्यवस्थितरीत्या रस्त्यांची सोय नसल्याने येथे एसटी बस जात नाहीत. त्यामुळे येथील नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी मिळाली तर खाजगी जीपने जावे लागत आहे. एसटी बस गाठण्यासाठी दापटी येथे ८ किमी डोंगरदरी चढून बस गाठावी लागत आहे. आदिवासी पाडे अंधारातच...वावर-वांगणी गावांपैकी रिठीपाडा, सरोळीपाडा, पाचभूड, गोंडपाडा, ताडाचापाडा यांना अद्यापही विद्युत पोहोचलीच नाही. त्यामुळे या पाड्यातील कुटुंबे आजही अंधारातच चाचपडत आहेत. लाइटची सोय नसल्याने येथील जि.प. शाळा व आश्रमशाळेतील मुलांची गैरसोय होत आहे. दिवाबत्तीचा आधार घेत अभ्यास करावा लागत आहे.या भागात आदिवासी विकास विभागाची एक आश्रमशाळा तर रयत शिक्षण संस्थेची वावर येथे एक शाळा आहे. अशा इ. १ ली ते १० वीपर्यंत या भागात दोन शाळा आहेत. परंतु, येथे शिक्षकवर्गाची कमतरता आहे. जि.प. शाळा प्रत्येक पाड्यात आहेत. येथील जिल्हा परिषद शाळा एका शिक्षकावर चालत आहेत. शिक्षणाचीही मोठी गंभीर समस्या आहे. तर, रोजगार हमीची कामे व मुबलक प्रमाणात रोजगार मिळत नसल्याने डोक्यावर गाठोडे बांधून स्थलांतर करावे लागत आहे. पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधांचा अभावजव्हार वावर-वांगणी हे गाव ग्रुपग्रामपंचायत असून त्यात १२ पाडे व ३ महसूल गावे आहेत. या गावात एकूण १००२ आदिवासी कुटुंबे राहत असून ग्रामपंचायतीची लोकसंख्या ४ हजार २०० आहे. हे गाव पालघर जिल्ह्याचे शेवटचे टोक असून लगत गुजरात, दादरा नगर हवेली या राज्यांच्या सरहद्दीवर ही आदिवासी लोकवस्ती राहत आहेत. या गावाजवळच वाघ नदीचे पात्र असूनही येथे नळपाणीयोजना नाही. आजही डोक्यावर हंडे घेऊन नदीकाठी जावे लागत आहे. तर सागपाणा, रिठीपाडा या पाड्यांवर एप्रिल, मे महिन्यांत भीषण पाणीटंचाईचा दरवर्षी सामना करावा लागत आहे. वावर-वांगणी गावात उपकेंद्र आहे. परंतु, येथे डॉक्टर व नर्सची कमतरता आहे. त्यामुळे आजही या वावर-वांगणी भागात कुपोषित बालकांचे प्रमाण अधिक आहे.