शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

बोईसरचा ५०० मीटर परिसर झाला सील

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2020 02:04 IST

तीन डॉक्टर आणि ४ कर्मचाऱ्यांना ‘होम क्वारंटाइन’ करून ५०० मीटरचा परिसर १४ दिवसांसाठी सील केला आहे. या संपूर्ण भागाचे सर्वेक्षण होणार आहे.

बोईसर : बोईसर येथील ३४ वर्षीय रुग्णाला ‘सारी’ची लक्षणे असल्याने त्याची कोरोना चाचणी केली असता तो पॉझिटिव्ह आढळून आला. यामुळे त्याचे जवळचे नातेवाईक व संपर्कात आलेल्या दहा जणांचे विलगीकरण करण्यात आले आहे. सोमवारी या सर्वांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, तर तीन डॉक्टर आणि ४ कर्मचाऱ्यांना ‘होम क्वारंटाइन’ करून ५०० मीटरचा परिसर १४ दिवसांसाठी सील केला आहे. या संपूर्ण भागाचे सर्वेक्षण होणार आहे.या रुग्णाचा मुंबई प्रवासाचा इतिहास असून त्याला पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. त्याच्या संपर्कातील १० जणांचे रविवारी रात्री उशिरा माहीम रोड येथे विलगीकरण केले आहे. सोमवारी पालघरचे उपविभागीय अधिकारी तोरस्कर, तहसीलदार सुनील शिंदे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजीत खंदारे, पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे इत्यादी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.बोईसर-तारापूर या मुख्य रस्त्यावरील सिडको बायपासपासून चित्रालय येथील पोलीस चौकीपर्यंतचा संपूर्ण भाग सील केला आहे. दलाल टॉवर, सिडको कॉलनी, भीमनागर, स्वरूप नगर, रूपरजत नगर, भय्या पाडा, दत्तवाडी, पीडीनगर, कोंबडी गल्ली, शांती नगर, पुष्कर पार्क, सोलंकी कॉम्प्लेक्स या भागांचा यात समावेश आहे. भाजीपाल्यासह जीवनावश्यक वस्तू बोईसर ग्रामपंचायतीच्या ‘जीपी बोईसर’ या अ‍ॅपवर आॅर्डर दिल्यास घरपोच मिळण्याची व्यवस्था केली आहे.>नागरिकांनी अजिबात घाबरून जाऊ नये. प्रशासनाला मदत करावी. प्रशासन आपले काम करीत आहे. सर्वांनी घरीच थांबून आरोग्य टीमला सहकार्य करावे. कोरोनासदृश काही लक्षणे असल्यास त्वरित आरोग्य विभागाला किंवा सिडको येथे स्थापन केलेल्या कंट्रोल रूमला कळवावे.- डॉ. अभिजित खंदारे, तालुका वैद्यकीय अधिकारी, पालघर तालुका.