शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
2
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
3
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
4
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
5
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
6
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
7
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
8
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
9
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
10
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
11
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
12
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
13
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
14
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
15
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
16
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
17
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
18
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
19
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
20
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!

चाळीस लाखांचा विनापरवाना लाकूडसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2018 1:13 AM

 वनविभागातील पश्चिम विभागाचे वनक्षेत्रपाल एच.व्ही सापळे व त्यांच्या इतर सहकऱ्यांनी वाड्यातील एका दास्तान डेपोवर धाड टाकली. या धाडीत या डेपोमध्ये विना परवाना लपवून ठेवलेला जवळपास ५० ते ६० ट्रक साग, खैर व इतर इंजाली असा १०१२ घनमीटर लाकूड साठा जप्त करु न तीन आरोपींना ताब्यात घेतले.

- वसंत भोईरवाडा -   वनविभागातील पश्चिम विभागाचे वनक्षेत्रपाल एच.व्ही सापळे व त्यांच्या इतर सहकऱ्यांनी वाड्यातील एका दास्तान डेपोवर धाड टाकली. या धाडीत या डेपोमध्ये विना परवाना लपवून ठेवलेला जवळपास ५० ते ६० ट्रक साग, खैर व इतर इंजाली असा १०१२ घनमीटर लाकूड साठा जप्त करु न तीन आरोपींना ताब्यात घेतले. जप्त केलेल्या संपूर्ण लाकडांची किंमत ४० लाखाहून अधिक असल्याचे वन अधिकाºयांकडून सांगण्यात येत आहे.वाडा-मनोर या राज्य महामार्गालगत ठाणगे पाडा येथे असलेल्या एका दास्तान डेपोत विना परवाना लाकडाचा मोठा साठा असल्याची खबर वाडा पश्चिम विभागाचे वनक्षेत्रपाल सापळे यांना महिनाभरापुर्वीच मिळाली होती. त्यांनी या दास्तान डेपोला २० जुलै २०१८ रोजी सील केले, व पुढील तपास सुरु केला. या तपासात या दास्तान डेपोवर या डेपोपासूनच अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या आलमान गावातील काही शेतकºयांच्या खाजगी मालकीतील साग, खैर व इतर इंजाली झाडे विनापरवाना तोडून त्याचा साठा ठाणगेपाडा येथील सुनील आंबवणे यांच्या मालकीच्या दास्तान डेपोवर ठेवण्यात आला होता.या प्रकरणी या दास्तान डेपोचे मालक सुनील आंबवणे रा. वाडा, राजू शिलोत्री रा. पोशेरी, व रमेश पाटील रा. पालसई या तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वरील आरोपींची वाडा न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली आहे.दोन महिने वनविभागाचा कानाडोळावाडा वनविभागाच्या कार्यालयापासून काही अंतरावर असलेल्या या दास्तान डेपोवर गेल्या दोनच महिन्यात ५० ते ६० ट्रक विनापरवाना साग, खैर व इतर इंजाली किंमती लाकडांचा साठा होत असतानाही येथील वन आधिकारी व कर्मचारी काय करीत होते की, त्यांच्याच आशिर्वादाने हा गोरख व्यवसाय सुरु होता अशी चर्चा येथील नागरिकांमध्ये सुरु झाली आहे.वाडा शहरात लाकडाचे एकुण ९ दास्तान डेपो असून या दास्तान डेपोवर देखरेख करणारे वाडा बीटचे वनपाल विष्णू मुळमुळे यांच्यावर या प्रकरणी निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती वनक्षेत्रपाल एच.व्ही. सापळे यांनी दिली आहे.

टॅग्स :newsबातम्याVasai Virarवसई विरार