शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

वसईकरांचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी मनसेकडून एमएमआरडीएला ४ दिवसांचा अल्टीमेटम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2023 20:22 IST

पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी सकाळी ११ वाजता मनपा मुख्यालयावर पाण्यासाठी विराट महामोर्चा काढणार आहे.

- मंगेश कराळे नालासोपारा : वसई विरारकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासनाने एमएमआरडीएच्या माध्यमातून सुर्याच्या नवीन योजनेतून वसई विरार शहराला १८५ एमएलडी अतिरिक्त पाणी मिळणार आहे. फक्त पीएम, सीएम, मंत्र्यांना या योजनेच्या उद्घाटनासाठी वेळ मिळत नसल्याने वसईकरांना पाणी मिळत नाही. यामुळे वसईकरांचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी मनसेकडून राज्य शासन, एमएमआरडीएला ४ दिवसांचा अल्टीमेटम देण्यात आला आहे. अन्यथा या पाण्याचे उदघाटन जाहीर करा, अन्यथा आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी उदघाटन करणार आहे, यासाठी गुन्हे अंगावर घेण्यास तयार असल्याचे मनसेचे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी पत्रकार परिषदेत बुधवारी सांगितले.

३० ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पाण्याचे उदघाटन होणार होते म्हणून काही बातम्या प्रसिध्द झाल्या. पण मोदींचा असा कोणताही प्रोग्राम नसल्याचे अविनाश जाधवांनी सांगितले. याबाबत मनपा आयुक्त अनिलकुमार पवार यांनाही माहीत नसल्याचे धक्कादायक माहिती त्यांनी दिली. खासदार व काही नेत्यांनी पाण्यासाठी मोर्चे काढून त्यात नागरिकांची दिशाभूल करून उदघाटनाची तारीख कशी काय सांगितली ? १३५० कोटींचे कंत्राट २३०० करोडवर गेल्याने १ हजार कोटींचे वाढलेले पाप कोणाचे? पाणी वसईत नागरिकांना मिळू नये यासाठी कोणी प्रयत्न केले?

सत्ताधारी पाण्यासाठी मोर्चा का काढत नसून गप्प का आहेत? योजनेचे काम व सर्व पाण्याच्या चाचण्या पूर्ण होऊनही सत्ताधारी व मनपाने १५ ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिनी वसईकरांना पाणी देऊन स्वातंत्र्य द्यायला पाहिजे होते. मनपा जर पाणी देऊ शकत नाही तर दोन ते अडीच वर्षांपासून नळाचे कनेक्शनचे पैसे का घेतले ? पाण्याचा साठा उपलब्ध नसतानाही टोलेगंज इमारतींना परवानगी का देत आहे ? पाण्याच्या उदघाटनासाठी कोणत्या नेत्यांची काय गरज आहे ? असे अनेक प्रश्न उपस्थित करून घणाघाती आरोप केला आहे.

पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी सकाळी ११ वाजता मनपा मुख्यालयावर पाण्यासाठी विराट महामोर्चा काढणार आहे. यासाठी शर्मिला राज ठाकरे सहभागी होऊन विशेष मार्गदर्शन करणार आहेत. 

खासदारांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करणारपाण्यासाठी मोर्चा काढून सभेत खासदार राजेंद्र गावित यांनी ३० ऑक्टोबरची तारीख कशी काय घोषणा केली ? मोर्चा काढून ढोंगीपणा करत तारीख जाहीर करून उदघाटन का लांबले ? पंतप्रधानांचा उदघाटनाचा कार्यक्रम दाखवावा आणि जर त्यात हा कार्यक्रम नसेल तर खासदारांनी जाहीर माफी मागावी. लोकांची फसवणूक करणाऱ्या खासदाराच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगितले. 

टॅग्स :Avinash Jadhavअविनाश जाधव