शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

३५ गावे मतदानावर टाकणार बहिष्कार; वसई-विरार महापालिकेतून गावे वगळण्याची शक्यता नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2020 01:34 IST

कोरोनामुळे स्थगित झालेली पालिकेची निवडणूक लवकरच होण्याची शक्यता आहे. गावे वगळण्यापूर्वीच निवडणुका होतील. त्यामुळे गावे वगळण्यासाठी या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्धार वसईकरांनी केला आहे

नालासोपारा : आगामी निवडणुकीनंतरच महापालिकेतून गावे वगळण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे ३५ गावांतील मतदारांकडून पालिका निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. येत्या काही दिवसांत जनप्रबोधनासाठी बैठकाही होणार आहेत.

वसई-विरार महापालिकेतून ३५ गावे वगळण्यासाठी गेल्या दहा वर्षांपासून लढा सुरू आहे. या लढ्यात उपोषण, पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराचा वापर, लोकप्रतिनिधींवर हल्ला, चुल बंद, गांव बंद अशी अनेक आंदोलने झाली. या आंदोलनातून प्रस्थापितांचा निवडणुकीत पराभवही झाला होता. तर गावे वगळण्यासाठी न्यायालयीन लढाही सुरू होता. तरीही पालिकेतून गावे वगळण्यात आली नाहीत. आजही आगाशी, कोफराड, बापाणे, ससुनवघर, भुईगांव, गास, गिरीज, कौलार, मर्देस, नवाळे, निर्मळ, नाळे, वाघोली, दहिसर, राजोडी, उमराळे, वटार, चांदीप, कशिदकोपर, कसराळी, कोशिंबे, चिंचोटी, देवदळ, कामण, कणेर, कोल्ही, मांडवी, शिरसाड, चोबारे, किरवली, मुळगांव, सालोली आणि वडवली ही गावे पालिकेतून मुक्त होण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

महानगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर तत्कालीन काँग्रेस सरकारने ही गावे वगळण्याचा निर्णय घेतला होता. त्यास हरकत घेऊन महापौर राजीव पाटील यांनी गावे वगळण्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयातून स्थगिती घेतली होती. याच मुद्यावर गावे वगळण्याचा निर्णय अडकून पडला आहे. गेल्या आठवड्यात २९ गावे पालिकेतून वगळण्याचा विचार राज्य सरकारने न्यायालयात सादर केला. मात्र, वगळलेल्या गावांची स्वतंत्र ग्रामपंचायत की नगरपरिषद स्थापन करायची याबाबत ग्रामस्थांची मते जाणून घेण्यासाठी तीन महिन्यांचा वेळ लागेल, असे सरकारने न्यायालयाला सांगितले. त्यामुळे पुढील तीन महिन्यात गावे वगळण्याची शक्यता धुसर झाली आहे.

दरम्यान, कोरोनामुळे स्थगित झालेली पालिकेची निवडणूक लवकरच होण्याची शक्यता आहे. गावे वगळण्यापूर्वीच निवडणुका होतील. त्यामुळे गावे वगळण्यासाठी या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्धार वसईकरांनी केला आहे. त्यासाठी हालचाली सुरू झाल्या असून अनेक संघटना त्यात सहभागी होणार आहेत.महापालिकेतून गावे वगळण्यासाठी मतदानावर बहिष्कार टाकणे, हा निर्णय कटू असला तरी गावांच्या अस्तित्वासाठी तो घ्यावाच लागणार आहे. तशी चाचपणी सुरू असून, ग्रामस्थांच्या सूचना विचारात घेतल्या जात आहेत. - मिलिंद खानोलकर, संस्थापक अध्यक्ष, मी वसईकर अभियान

टॅग्स :Vasai Virarवसई विरारElectionनिवडणूकVotingमतदान