शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

वसई-विरारला कोरोनासह क्षयबाधेचाही घट्ट विळखा, दोन महिन्यांत ३३५ क्षयरुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2021 02:25 IST

क्षयरोग रुग्णांची माहिती दडवल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा मध्यंतरी वसई-विरार शहर महानगरपालिकेने दिला होता. मात्र, आता क्षयरोगाचा वसई-विरारकरांभोवती विळखा वाढत असताना महापालिकेकडे क्षयरोग तपासणी करणारा तज्ज्ञच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. 

- प्रतीक ठाकूर विरार : क्षयरोग रुग्णांची माहिती दडवल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा मध्यंतरी वसई-विरार शहर महानगरपालिकेने दिला होता. मात्र, आता क्षयरोगाचा वसई-विरारकरांभोवती विळखा वाढत असताना महापालिकेकडे क्षयरोग तपासणी करणारा तज्ज्ञच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. कोरोनासोबतच  दोन महिन्यांत तब्बल ३३५ क्षयरोगाचे रुग्ण महापालिका हद्दीत आढळून आले आहेत. ऐन कोरोना महामारीच्या काळात क्षयरोगानेही डोके बाहेर काढले आहे. महापालिकेची आरोग्य यंत्रणा कोरोना प्रादुर्भावाशी लढण्यात व्यस्त असताना क्षयरोग रुग्णांची त्यात हेळसांड होत असल्याचे दिसून येते.  महापालिकेनेच दिलेल्या माहितीनुसार, गतवर्षात २०२० मध्ये क्षयरोगाचे एकूण तीन हजार २५१ रुग्ण आढळून आले होते. त्यात १३७ रुग्णांचा मृत्यू झाला होता. नवीन वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी ते फेब्रुवारी अशा दोन महिन्यांत म्हणजेच एकूण ६० दिवसांत क्षयरोगाचे तब्बल ३३५ रुग्ण आढळून आले आहेत. यात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. शहरात असलेल्या झोपडपट्ट्यांत तसेच स्थलांतरित होऊन आलेले नागरिक यांच्यात क्षयरोगाचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून येते. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून क्षयरोगाच्या रुग्णांवर मोफत उपचार करण्याची तजवीज आहे. सध्या वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या हद्दीत क्षयरोगाचे प्रमाण वाढत असताना मंजूर करण्यात आलेली आठ थुंकी तपासणी केंद्रे सुरूच झाली नसल्याची धक्कादायक माहिती आहे.   पालिकेकडे क्षयरोगतज्ज्ञ नसल्याने पालिकेने दोन खासगी डॉक्टरांची नेमणूक केली आहे. विरार व वालीव अशा दोन केंद्रांत या डॉक्टरांची महापालिकेकडून वर्णी लावण्यात आली आहे. क्षयरोगाच्या उपचारासाठी महापालिकेकडून पुरविण्यात आलेल्या सुविधा मर्यादित असून त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. क्षयरोगाच्या वाढत्या प्रादुर्भावावर उपाययोजना म्हणून महापालिकेने पाच युनिट तयार केले असून त्यात पाच निरीक्षक नेमले आहेत. तसेच केवळ २५ ते ३० कर्मचाऱ्यांवर शहरांचा भार सोपवण्यात आला आहे. पालिकेच्या तुळिंज व वालीव येथील केंद्रांत क्षयरोग निदानासाठी व्यवस्था करण्यात आली असली, तरी तुळिंज येथील केंद्रातील मशीन बंद असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे.  थुंकी तपासणीसाठी खासगी रुग्णालयांचा आधार याआधी ओपीडींद्वारे होत असलेली क्षयरुग्णांची तपासणी कोरोनामुळे ऑगस्ट महिन्यापासून बंद आहे. क्षयरोग हा टीबीचा प्रकार असून त्यात मल्टीट्रग रेझिस्टंट क्षयरोग हा अतिशय धोकादायक ठरू शकतो. वसई-विरार महानगरपालिकेकडून क्षयरोगाचे निदान होण्यासाठी एकूण २१ तपासणी केंद्रे मंजूर झाली आहेत. मात्र सद्य:स्थितीत केवळ १३ तपासणी केंद्रे सुरू असल्याचे समजते. रुग्णांना थुंकी तपासणीसाठी खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागतो. महापालिकेच्या केंद्रांत असलेल्या थुंकी तपासणीच्या अहवालासाठी रुग्णांना प्रतीक्षा करावी लागत आहे. 

टॅग्स :Healthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्याVasai Virarवसई विरार