शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
3
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
4
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
5
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
6
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
7
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
8
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
9
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
10
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
11
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
12
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
13
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
14
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
16
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
17
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
18
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
19
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
20
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला

मनाई आदेशाचे उल्लंघन करत रस्ता अडवणाऱ्या आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यास ३३ तास 

By धीरज परब | Updated: November 5, 2023 19:36 IST

नया नगर पोलिसांनी निदर्शने करणाऱ्या एका कम्युनिस्ट पक्षाशी संलग्न समितीच्या ७ जणांवर अवघ्या ३ तासात गुन्हा दाखल केला.

मीरारोड - पोलीस आयुक्तालयाचा मनाई आदेश मोडून शुक्रवारी मीरा भाईंदर महापालिकेसमोरील रस्ता अडवून आंदोलन करणाऱ्या भाजपा माजी आमदार नरेंद्र मेहतांसह सहभागी आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यास भाईंदर पोलिसांना ३३ तास लागले. परंतु नया नगर पोलिसांनी निदर्शने करणाऱ्या एका कम्युनिस्ट पक्षाशी संलग्न समितीच्या ७ जणांवर अवघ्या ३ तासात गुन्हा दाखल केला. मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ८ नोव्हेम्बर पर्यंत मनाई आदेश लागू केला आहे . मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाशी संलग्न डेमोक्रेटिक सिटीझन कमिटीने मीरारोडच्या नया नगर भागात पॅलेस्टिनच्या नागरिकांवर अत्याचार झाल्याचे कारण देऊन निदर्शने करण्यासाठी परवानगी मागितली होती . परंतु नया नगर पोलिसांनी मनाई आदेश लागू असल्याने तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल म्हणून परवानगी नाकारली. तरी देखील कमिटीच्या वतीने २ नोव्हेम्बरच्या रात्री पावणे नऊ वाजे पर्यंत निदर्शने , घोषणाबाजी केल्याने हवालदार निवृत्ती कर्डेल यांच्या फिर्यादी वरून तीन तासात म्हणजेच ३ नोव्हेम्बरच्या मध्यरात्री १ च्या सुमारास सादिक पाशा, सुखदेव बिनबंसी, शाहिद प्रधान आदी ७ जणांवर गुन्हा दाखल केला गेला. 

तर शुक्रवार ३ नोव्हेम्बर रोजी भाईंदर पश्चिमेस महापालिका मुख्यलाया बाहेरील रस्त्यावर मेहतांसह भाजपा जिल्हाध्यक्ष, माजी नगरसेवक , पदाधिकारी आदींनी मुख्य रस्ता अडवून आंदोलन केले . रस्त्यावर क्रिकेट खेळले , खाली बसून राहिले व घोषणाबाजी केली . यामुळे वाहतूक बंद पडून विद्यार्थी , वृद्ध व नागरिक वाहनात अडकून पडले . त्यांना त्रास सहन करावा लागून वेठीस धरले गेले . रस्ता अडवून वाहतूक व रहदारीला अडथळा आणला असताना देखील पोलिसांनी आंदोलकांना तात्काळ बाजूला करून रस्ता मोकळा करण्या ऐवजी बघ्याची भूमिका घेतल्याने टीकेची झोड उठली . मेहता व आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ होत असल्याने अनेकांनी पोलिसां कडे तक्रारी केल्या. 

अखेर भाईंदर पोलिसांनी शनिवार ४ नोव्हेम्बरच्या रात्री ११ . ५७ च्या सुमारास म्हणजेच आंदोलनाच्या ३३ तासांनी गुन्हा दाखल केला आहे . शुक्रवारी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजे पर्यंत आंदोलन केले . त्यावेळी रस्ता अडवून रस्त्यावर क्रिकेट खेळून , रस्त्यावर बसून वाहतूक कोंडी केली . चालणारे पादचारी व रहदारीला अडथळा आणला तसेच पोलीस आयुक्तालयाच्या मनाई आदेशाचा भंग केला म्हणून नरेंद्र मेहता सह भाजपा जिल्हाध्यक्ष किशोर शर्मा , माजी महापौर ज्योत्सना हसनाळे व डिम्पल मेहता , माजी उपमहापौर हसमुख गेहलोत , माजी नगरसेवक अरविंद शेट्टी ,संजय थेराडे , नयना म्हात्रे , रुपाली शिंदे , मदन सिंह ,  प्रशांत दळवी , अशोक तिवारी, अजित पाटील , दिनेश जैन ,वर्षा भानुशाली, शानू गोहिल, दिलीप जैन सह एकूण ४५ जणांच्या नावानिशी व अन्य १०० ते १२५ जण असे मिळून एकूण १४५ ते १७०  गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक माणिक कतुरे तपास करत आहेत. तर अडवून धरलेला रस्ता मोकळा करण्या ऐवजी बंदोबस्तास असलेले उत्तन सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश मासाळ यांचे नरेंद्र मेहतांशी रस्त्यावर सुहास्यवदनाने हस्तांदोलन करतानाचे छायाचित्र समाज माध्यमावर चर्चेत आले आहे .  त्यावरून आता, हे तर पोलिसांच्या लांगुलचालनपणाचे आणखी एक उघड उदाहरण असल्याचा आरोप होत आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारmira roadमीरा रोड