शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पालघर जिल्ह्यात ३३ लाचखोर पकडले; भ्रष्ट्राचा-यांची माहिती द्या, पोलीस उपअधीक्षक आफळे यांचे जनतेला आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 03:41 IST

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आतापर्यंत जिल्ह्यातील ३३ लाचखोर अधिकारी-कर्मचाºयांना सापळा रचून पकडले असून शासकीय अधिका-यांनी लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी पालघर मधील सूर्या कॉलनी मध्ये असलेल्या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस उपअधीक्षक अजय आफळे यांनी केले आहे.

- हितेंन नाईक

पालघर : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आतापर्यंत जिल्ह्यातील ३३ लाचखोर अधिकारी-कर्मचाºयांना सापळा रचून पकडले असून शासकीय अधिका-यांनी लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी पालघर मधील सूर्या कॉलनी मध्ये असलेल्या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस उपअधीक्षक अजय आफळे ह्यांनी केले आहे.पालघर, डहाणू, तलासरी इ.तालुक्यातील तक्रारकर्त्या नागरिकांना ठाणे जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे असलेले कार्यालय लांबचे पडत असल्यामुळे शासकीय अधिकारी-कर्मचाºया विरोधात इच्छा असूनही तक्र ारी दाखल केला जात नव्हत्या. मात्र आता स्वतंत्र पालघर जिल्हा अस्तित्वात आल्यानंतर आठ तालुक्यातील नागरिकांना पालघर च्या सूर्या कॉलनी मध्ये असलेले कार्यालय सोईचे पडू लागल्याने तक्रारदार पुढे येऊ लागले आहेत. पालघरच्या प्रांताधिकाºयांना ५० लाखाची लाच मागणे, आदिवासी प्रकल्प अधिकारी, जव्हार यांना ५० हजाराची, तसेच वसई-विरार महानगर पालिकेतील अधिकारी, मंडळ अधिकारी, तलाठी, पोलीस इ. ३३अधिकारी कर्मचाºयांना पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने यशस्वीरीत्या सापळा रचून अटक केली असून ९ अधिकाºयावर उत्पन्न पेक्षा अधिक मालमत्ता बाळगल्या प्रकरणी कारवाई केल्याने हळूहळू लोकांमध्ये लाचलुचपत विभागा बद्दल विश्वास निर्माण होऊ लागला आहे.लोकांनी अधिकाधिक संख्येने पुढे यावे यासाठी आजपासून (३० आॅक्टोबर ते ४ नोव्हेंबर) दक्षता जनजागृती मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. सर्व कार्यालयाच्या इमारतीच्या दर्शनी भागात भ्रष्टाचारा संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाºया लोकसेवका बद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करणारे फलक लावून त्यावर कार्यालयीन पत्ता, फोन नंबर, इ. लावणे सक्तीचे केले आहे. तसेच शाळा, महाविद्यालये, ग्रामसभा इ.भागात ही भ्रष्टाचाराविरोधातील जनजागृती व्हावी ह्यासाठी चर्चासत्रे, व्याख्याने, निबंध स्पर्धा इ.चे आयोजन पालघर विभागांतर्गत करण्यात येणार आहे.राज्यात प्रत्येक वर्षी सरदार वल्लभ भाई पटेल ह्यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून या सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. राज्य शासनाचे सर्व विभाग व त्यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या सर्व विभागा मध्ये शपथ घेऊन त्याची सुरूवात झाली

टॅग्स :Crimeगुन्हा