शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

वसतीगृहांना मिळाले ३ कोटी; भोजन, नाश्ता मिळणार अखंडीत, बचतगटांनी सोडला नि:श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 02:18 IST

लोकमतच्या बातमीनंतर प्रशासनाला जाग

- शौकत शेखडहाणू : आदिवासी विकास प्रकल्पामार्फत पालघर जिल्हयात चालविल्या जाणाºया शासकीय निवासी वसतीगृहात भोजन पुरवठा करणा-या आदिवासी महिला बचतगट तसेच काही ठेकेदारांची गेल्या काही महिन्यांची रखडलेली बिले लोकमतमध्ये वृत्त येताच जिल्हाधिकाºयांनी त्याचे ३.३० कोटीचे अनुदान डहाणू प्रकल्प कार्यालयाकडे वर्ग केली असून हे भोजन आता सुरू राहणार आहे.दोन, तीन महिन्यांपासून आहाराची बीले अदा केली जात नव्हती. त्यामुळे भोजनाचा ठेका बंद करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. लोकमतने ही व्यथा मांडणारे वृत्त दिल्यावर प्रशासनाला जाग आली. जिल्हाधिकारी कार्यालयाने याची तातडीने दखल घेऊन जव्हार प्रकल्प कार्यालय येथून डहाणू प्रकल्पाला तातडीने अनुदान वर्ग केल्याने या ठेकेदारांची आहाराची बीले अदा करण्यास सुरूवात झाली आहे.डहाणू एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत डहाणू, तलासरी पालघर, वसई असे चार तालुके येतात त्यात शासनामार्फत एकूण ३४ आश्रमशाळा आहेत. दुर्गम भागांत राहणाºया आदिवासी विद्यार्थ्यांना शहरी भागात राहून उच्च शिक्षण घेता यावे म्हणून शासनाने वसई, पालघर, वानगांव, डहाणू, बोर्डी, कासा, वडकून, विरार इत्यादी भागात निवासी शासकीय वसतीगृह सुरू केले आहेत. येथे आदिवासी विद्यार्थ्यांना नाश्ता, दोन वेळचे जेवण, निर्वाहभत्ता, शैक्षणिक सहल, पुस्तके, वह्या,तेल, साबण, छत्री, गमबूट इत्यादी सोयीसुविधा शासनामार्फत पुरविल्या जातात.सन २०१८-१९ चे शैक्षणिक वर्ष सुरू झाल्याने जिल्हयातील सर्व शाळा, महाविद्यालय, आश्रमशाळा तसेच निवासी वसतीगृह १५ जून पासून सुरू झाले असले तरी डहाणू आदिवासी विकास विभागाला राज्य तसेच जिल्हास्तरावरून मिळणारे अनुदान न मिळाल्याने योजना ठेकेदारांची मार्च, एप्रिल, तसेच जूनची पोषण आहाराची बीले न मिळाल्याने त्यांची आर्थिक कोंडी झाली होती.विद्यार्थी, ठेकेदारांनी मानले लोकमतचे आभारनिवासी वसतीगृह बंद करण्याची वेळ यामुळे आली होती. याबाबत १५ जूलैला लोकमत ने आवाज उठविल्याने जिल्हाधिकारी कार्यालय (पालघर) यांनी त्वरीत दखल घेऊन ३ कोटी ३० लाख अनुदान डहाणू प्रकल्प कार्यालयाला वर्ग केल्याने डहाणू प्रकल्प कार्यालयाची आर्थिक कोंडी सुटून महिला बचत गट तसेच आदिवासी विद्यार्थ्यांबरोबरच इमारत भाडे इत्यादी बीले मंजूर होण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे संबंधितांनी लोकमतचे आभार मानले आहेत.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार