शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

महापालिकेतून २९ गावे वगळली, वसईत जल्लोष

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 00:50 IST

राज्य वसई- विरार महापालिकेतील २९ गावे वगळण्याचा निर्णय सरकारने घेतला असून त्यासंदर्भातील प्रतिज्ञापत्र नगरविकास खात्यामार्फत मंगळवारी सकाळी मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आले आहे.

वसई : राज्य वसई- विरार महापालिकेतील २९ गावे वगळण्याचा निर्णय सरकारने घेतला असून त्यासंदर्भातील प्रतिज्ञापत्र नगरविकास खात्यामार्फत मंगळवारी सकाळी मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत वसई जनआंदोलन समितीने लढा दिला होता. ३१ मे २०११ रोजी वसई विरार महापालिकेतून २९ गावे वगळण्याचा निर्णय सुरुवातीला राज्य सरकारकडून घेण्यात आला होता. मात्र, या निर्णयाला त्यावेळी वसई-विरार पालिकेने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. तेव्हापासून गावांचे हे प्रकरण उच्च न्यायालयात सुरू आहे. त्यानंतर शासनाने प्राप्त झालेल्या निवेदनानुसार विभागीय आयुक्तांचा अहवाल मागवला होता.त्यानुसार ८ जानेवारी २०१६ रोजी शासनाने उच्च न्यायालयात एक प्रतिज्ञापत्र दाखल केले. विभागीय आयुक्तांच्या अहवालात २९ गावांचा समावेश पुन्हा महापालिकेत करावा अशी शिफारस होती.परंतु त्यानंतर झालेली आंदोलने, गावकऱ्यांची प्राप्त झालेली निवेदने याद्वारे या २९ गावांचा समावेश महापालिकेत करू नये, अशी आग्रही मागणी केली होती. त्यावेळी गावकऱ्यांची मागणी पाहता विभागीय आयुक्तांनी सादर केलेल्या शिफारशीत गावकºयांचे म्हणणे ऐकून घेतले नाही तसेच, त्यांना सुनावणीची संधी देखील दिली नाही. अशी संधी न देता २९ गावांचा समावेश महापालिकेत करावा अशी शिफारस केली होती. ही शिफारस पूर्वग्रहदूषित असल्याचे आढळून आले. त्यामुळे ग्रामस्थांच्या भावना विचारात घेऊन शासनाने या गावांच्या बाबतीत त्यांच्याशी सल्लामसलत करण्याचा निर्णय घेतला होता. या मुद्यांवर मे २०१८ मध्ये ठरल्यानुसार तीन महिन्यांत गावकºयांशी सल्लामसलत करून योग्य तो निर्णय शासन घेईल, अशा आशयाचे प्रतिज्ञापत्र त्यावेळी सुद्धा सादर करण्यात आले. ते गावांच्या याचिकेतील सर्व संबंधितांना देण्यात ही आले आहे, अशी माहिती जनआंदोलन समितीने त्यावेळी दिली होती. त्यानंतर २४ मे २०१८ रोजी राज्य सरकारच्या नगर विकास विभागाचे उपसचिव शंकर जाधव यांनी हे प्रतिज्ञापत्र तयार केले होते.गतवर्षी पार पडलेल्या पालघर लोकसभा मतदारसंघाच्या पोट निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी मुख्यमंत्र्यांनी ही गावे महापालिकेतून वगळण्याचे आश्वासन दिले होते. त्याची पूर्तता आता या लोकसभा निवडणुकीच्या मुहूर्तावर करून एकप्रकारे मुख्यमंत्र्यांनी आपण आश्वासन पूर्ती केल्याचा संकेत मतदारांना दिला आहे. असे यावरून स्पष्ट झाले आहे. याचा आता मतदारांवर कोणता परिणाम होतो हे पाहणे महत्वाचे ठरेल. या प्रतिज्ञापत्राबाबत न्यायालय कोणती भूमिका घेते याकडेही जिल्ह्यातील तमाम जनतेचे लक्ष लागून राहणार आहे.>महापालिकेला फटका, उत्पन्नात मोठी घट होण्याची शक्यता?ही गावे वगळल्यामुळे महापालिकेच्या विविध कर उत्पन्नात घट होण्याची शक्यता आहे. त्याचा आर्थिक फटकाही तिला बसू शकतो.या जिल्ह्यातील जव्हारसारखी छोटी गावेही हद्दवाढीची मागणी करतात. मुख्यमंत्र्यांनी ती मागणी मान्यही केली आहे. अशा स्थितीत महापालिकेची हद्द यामुळे घटेल.या निर्णयामुळे या गावातील विकासाचे काय? त्याची सूत्रे एमएमआरडीएकडे असतील ती ग्रामपंचायतीकडे असतील असा प्रश्न निर्माण होणार आहे.>वसई विरार पालिकेतून २९ गावे वगळणे हा निर्णय जरी राजकीय असला तरी तो ऐतिहासिक आहे, मात्र तरीही नुसती गावे वगळून पुढील जटील प्रश्न सुटणार नाही, तर आता पुढे या गावांचे काय? हा सुद्धा निर्णय महत्वाचा आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. हे यश या सगळ्या दहा वर्षाच्या अविरत संघर्षाचे आहे.-विवेक पंडीत, अध्यक्ष, २९ गाव जनआंदोलन समिती>सरकारने प्रतिज्ञापत्र सादर करून गावे वगळली याची मला सुतराम कल्पना नाही. मी जव्हारमध्ये प्रचारात व्यस्त आहे.-आ.हितेंद्र ठाकूर, अध्यक्ष, बहुजन विकास आघाडी

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019palghar-pcपालघरVasai Virarवसई विरार