- पंकज राऊत, बोईसर१ मेला असणारा रेल्वेचा मेगा ब्लॉक व सेंटरच्या पत्त्यातील गोंधळामुळे केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड (सीबीएसई) दिल्ली द्वारा रविवारी घेण्यात आलेल्या अखिल भारतीय प्रो. मेडिकल / प्रा-डेंटल ए.आय.पी.एम.टी प्रवेश परीक्षेला राज्याच्या विविध जिल्ह्यातून आलेल्या अठ्ठावीस विद्यार्थ्याना बोईसर येथील परीक्षा केंद्रावर पोहचण्यास अवघे काही मिनिट उशीर झाल्याने परीक्षेपासून वंचित रहावे लागले. या प्रकारामुळे विद्यार्थी व पालकांना हताश होऊन परतावे लागले.रविवारी एआयपीएमटी ही परीक्षा देशभरात एकाच वेळी घेण्यात आली. त्या परीक्षेसाठी महाराष्ट्रातील फक्त मुंबई, नागपूर व ठाणे ही तीन परीक्षाकेंद्र होती. परीक्षेची वेळ सकाळी दहा ते दुपारी एक अशी होती आणि परीक्षा केंद्रावर शेवटची एन्ट्रीची वेळ साडेनऊ वाजताची होती. परंतु आज रेल्वेच्या मेगाब्लॉकमुळे पर जिल्ह्यातून रेल्वेने आलेल्या विद्यार्थी साडेनऊ ऐवजी पावणे दहाच्या सुमारास परीक्षा केंद्रावर पोहोचले. तर परीक्षेचे सेंटर पालघर जिल्ह्यात असून प्रोव्हीजोनल अॅडमीटकार्ड (हॉल तिकीट)वर पालघर जिल्ह्या ऐवजी ठाणे जिल्ह्याचा उल्लेख होता. त्यामुळे काही विद्यार्थ्यांचा ठाणे जिल्ह्यात सेंटर शोधण्यात वेळ वाया गेला.अखेरच्या क्षणी बहूसंख्य विद्यार्थी खाजगी कारने बोईसरला पोहोचले. परंतु औरंगाबाद, लातूर, बीड, उस्मानाबाद, नाशिक, सातारा, रायगड, अहमदनगर, जळगाव आदी जिल्ह्यातून आलेल्या विद्यार्थ्यांना ठाणे आणि पालघर या गोंधळामुळे त्यांच्या संभ्रम निर्माण होऊन सकाळचा वेळ वाया जाऊन त्यांना अखेर मुकावे लागले.चिन्मय विद्यालयातील प्रकारपालघर जिल्ह्यातील बोईसर येथील चिन्मया विद्यालयात घेण्यात आलेल्या परीक्षेला अवघे काही मिनिटे उशीरा पोहोचलेल्या विद्यार्थ्यांनी व पालकांनी अत्यंत कळकळून विनंती करूनही त्यांना संधी दिली नाही.या घटनेचे वृत्त मनसेचे जिल्हा प्रमुख अरुण कदम, उपजिल्हा प्रमुख अनंत दळवी, तालुका प्रमुख समीर मोरे, पदाधिकारी शिवाजी टेंबाळकर, चेतन संखे इ. ना कळताच त्यांनी घटनास्थळी पोहचून विद्यार्थी व पालकांशी संवाद साधला आणि त्यांनी शाळा व्यवस्थापन व आॅब्जर्रर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यांना शाळेच्या सुरक्षाबल व पोलिसांनी शाळेच्या प्रवेश द्वारावरच रोखून धरले तर झालेल्या प्रकाराबाबतची माहिती देण्यासही आॅब्जरांनी पत्रकारांना स्पष्ट नकार दिला.कुठलेही ठोस आश्वासन नाहीदुपारी एक वाजता परीक्षा संपल्यानंतर आॅब्जररांनी परीक्षेपासून वंचित राहिलेल्या २८ विद्यार्थ्यांना विद्यालयात बोलावून त्या विद्यार्थ्यांकडून पुन्हा परीक्षेला बसू देण्यासंदर्भात विनंती पत्र लिहून घेतले. मात्र कुठलेही ठोस आश्वासन न दिल्याने आणि वर्षभर अभ्यास करून परीक्षा न देता आल्याने विद्यार्थी व पालक निराश होऊन परतले. तर २४ जुलै २०१६ रोजी होणाऱ्या नीट २ या परीक्षेला बसू दिले तर या विद्यार्थ्यांवर झालेला अन्या दूर होईल अन्यथा परीक्षेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांचा दोष नसताना त्यांचे वर्ष वाया जाण्याची भीती आहे.
‘मेगा’ गोंधळामुळे ‘२८ बळी’
By admin | Updated: May 2, 2016 01:21 IST