शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

सूर्या जलवाहिनीतून दररोज २०० टँकर पाण्याची चोरी, कोपर येथील प्रकार  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2019 00:32 IST

वसई तालुक्यात पाणी टंचाईची स्थिती असतांना  वसई विरार महापालिकेच्या सूर्या जलवाहिनी तून रोज २०० टँकर पाण्याची चोरी कोपर व खराटतारा या गावातून होत आहे.

पारोळ : वसई तालुक्यात पाणी टंचाईची स्थिती असतांना  वसई विरार महापालिकेच्या सूर्या जलवाहिनी तून रोज २०० टँकर पाण्याची चोरी कोपर व खराटतारा या गावातून होत आहे. हा भाग पेल्हार प्रभागात येत असल्याने शिरसाड येथील कार्यालय जवळ असतांना ही पाणीचोरी होते कशी  हा प्रश्न या भागातील नागरिकांना पडला आहे.पाणीचोरी ही सूर्याच्या जलवाहिनीचे पाणी विहिरीत टाकून व तिला इंजिन बसवून त्या मधून टँकर भरले जातात. एका टँकरचे दोनशे रुपये असा दर घेतला जातो. या पद्धतीने रोज लाखो लिटर पाण्याची चोरी या ठिकाणी होत आहे. या चोरीत महापालिका कर्मचाऱ्यांचाही सहभाग असल्याचे बोलले जात आहे. अनेक वर्षा पासून ही पाणी चोरी  सुरू असून या बाबत मागील वर्षी ही पाणीचोरी बाबत लोकमत ने आवाज उठवला होता. तेव्हा या ठिकाणी कारवाई झाली होती. पण या प्रकाराला या भागातील महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची साथ असल्याने या वर्षी ही पाणी चोरी जोरात सुरू झाली आहे. वसई तालुक्यात पाणी टंचाई ची झळ असतांना जनतेच्या पाण्यावर माफिया डल्ला मारत असल्याने या प्रकार थांबविण्यासाठी वसई विरार महापालिकेने पाऊल उचलण्याची गरज आहे.कोपर येथे होत असलेल्या पाणी चोरी बाबत तपास करून कारवाई करण्यात येणार असून या मध्ये महापालिका कर्मचारी यांचे हितसंबंध असतील त्यांची ही चौकशी करण्यात येईल.- सुरेंद्र ठाकरे,पाणी पुरवठा अधिकारी वसई विरार शहर महापालिकाचोरी लक्षात येऊ नये म्हणून पाणी आधी विहिरीत टाकले जाते. व नंतर ते मोटारने टँकरमध्ये भरले जाते.

 

टॅग्स :palgharपालघर