शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
3
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
4
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
5
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
6
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
7
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
8
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
9
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
10
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
11
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
12
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
13
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
14
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
15
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
16
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
17
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
18
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
19
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
20
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...

शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू, अपंगत्व आल्यास दोन लाखांची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2022 13:15 IST

शेतकऱ्याला अपघात झाल्यास कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होते, म्हणून अशावेळी अपघातग्रस्त शेतकऱ्यास किंवा त्याच्या कुटुंबास योजनेच्या माध्यमातून अर्थसाहाय्य देण्यात येते.

- हितेन नाईक

पालघर : राज्यात शेती व्यवसाय करताना होणारे अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक बसणे आदी आपत्तींमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील वाहन अपघात, तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे अपघात झाल्यास आता शासन आपल्या मदतीसाठी धावणार आहे. अपघातामुळे मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत शासनातर्फे अर्थसाहाय्य देण्यात येते.

शेतकऱ्याला अपघात झाल्यास कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होते, म्हणून अशावेळी अपघातग्रस्त शेतकऱ्यास किंवा त्याच्या कुटुंबास योजनेच्या माध्यमातून अर्थसाहाय्य देण्यात येते. सातबाराधारक शेतकऱ्यांचा विमा हप्ता शासनामार्फत भरला असून, दोन लाख रुपयांचा विमा उतरविण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी अर्जाच्या नमुन्यासाठी कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक किंवा तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.

अपघाताचा प्रसंग घडल्यास शेतकरी किंवा त्यांच्या वारसदाराने तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यालयामार्फत शासनाचे विमा सल्लागार प्राथमिक छाननी करून प्रस्ताव विमा कंपनीकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवितात.

५० पैकी ७ प्रस्ताव मंजूरगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनंतर्गत २०२०-२१ मध्ये आठ तालुक्यांतील ५० प्रस्ताव विमा कंपनीकडे सादर केले. त्यातील ७ प्रस्ताव मंजूर झाले. कंपनीकडे २९ प्रलंबित असून, दोन प्रस्ताव अपूर्ण कागदपत्रांमुळे रद्द झाले आहेत, तर त्रुटी प्रलंबित १२ प्रस्ताव पडून आहेत.

दोन डोळे किंवा दोन अवयव गेले तर दोन लाखअपघातामुळे दोन डोळे अथवा दोन अवयव निकामी झाल्यास दोन लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात येते

एक अवयव गेल्यास एक लाखशेतीची कामे करताना अपघात झाल्यास अथवा अपघातामुळे एक डोळा व एक अवयव निकामी झाल्यास एक लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात येते

अपघाती मृत्यू झाल्यास दोन लाखएखाद्या शेतकऱ्याचा शेतीची कामे करताना अपघाती मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास दोन लाखांची नुकसानभरपाई देण्यात येते.

मदतीसाठी अर्ज कोठे कराल?एखाद्या शेतकऱ्याचा अपघात झाल्यानंतर सदर योजनेंतर्गत दावा करण्यासाठी शेतकऱ्याला किंवा त्याच्या वारसाला नजीकच्या तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे अपघातानंतर ४५ दिवसांच्या आत दावा अर्ज सादर करावा लागेल, तसेच दावा अर्जासोबत योग्य ती कागदपत्रे जोडावी लागतील. अधिकाऱ्याकडून दाव्याची तपासणी करून लाभ दिला जाईल.

अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसाने ४५ दिवसांच्या आत योग्य कागदपत्रांसह तालुका कृषी अधिकाऱ्याकडे आपला प्रस्ताव दाखल करावा.     - जिल्हा कृषी अधीक्षक, पालघर

टॅग्स :Vasai Virarवसई विरार