बोईसर : तारापूर एमआयडीसीतील प्लॉट नंबर टी-१४१ मधील नंदोलिया ऑर्गेनिक केमिकल्स प्रा. लि. या रासायनिक कारखान्यात सोमवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास झालेल्या भीषण स्फोटात २ ठार व ४ जखमी झाले आहेत. संदीप कुशवाहा असे एका मृताचे नाव आहे. तर मोहम्मद मोहसीन अल्ताफ (३०), दिलीप गुप्ता (२८), उमेश कुशवाहा (२२), प्रमोदकुमार मिश्रा (३५) जखमी झाले, त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे.पाणी जास्त झाल्याने रिअॅक्टमधील दाब वाढून स्फोट झाल्याचा अंदाज आहे.रासायनिक प्रक्रियेदरम्यान रिअॅक्टरच्या वरील भागाच्या झालेल्या भीषण स्फोटाची तीव्रता एवढी होती की, सर्वत्र जोरात हादरा बसून स्फोटाचा आवाज परिसरात सुमारे पंधरा किलोमीटरपर्यंत पोहोचला. तर रिअॅक्टरचा काही भाग शेजारच्या कंपनीत हवेतून उडून पडला.
तारापूरमध्ये भीषण स्फोटात 2 ठार, 4 जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2020 05:44 IST