शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

नागरी वस्तीतून पकडले १९ साप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 23:37 IST

नालासोपारा : वसई तालुक्यातील नागरी वस्तीतून एकाच दिवशी अग्निशमन दलाच्या जवानांनी तब्बल विविध जातींचे १९ सर्प पकडल्यामूळे नागरीकांमध्ये खळबळ ...

नालासोपारा : वसई तालुक्यातील नागरी वस्तीतून एकाच दिवशी अग्निशमन दलाच्या जवानांनी तब्बल विविध जातींचे १९ सर्प पकडल्यामूळे नागरीकांमध्ये खळबळ उडाली आहे. गेल्याच महिन्यात नागरी वस्तीतून दोन मोठ्या घोरपडी पकडण्यात आल्या होत्या.

वसई विरार महापालिकेची पाच अग्निशमन केंद्रे आहेत. अद्ययावत सामुग्रीसह तैनात असलेल्या या केंद्रातील कर्मचाऱ्यांमध्ये सर्पमित्रही आहेत. नागरी वस्तीत साप आढळून येत असतात. याबाबत अग्निशमन दलाच्या केंद्रात नागरीकांचे फोन येत असतात. मात्र बुधवारी सकाळपासून अग्निशमन दलाच्या केंद्रात तब्बल १९ फोन साप आढळून आल्याचे आल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना पकडून ताब्यात घेतले आहे.यात विषारी व बिनविषारी सापांचा समावेश आहे.

आग लागणे असो किंवा कुठेही इमारत कोसळणे असो, गॅसगळती असो किंवा एखादा पक्षी झाडावर किंवा कोणत्याही वायरवर अडकलेला असो, अशा आपत्तीच्या प्रसंगी अग्नीशमन दलाला पाचारण केलं जातं. मात्र अनेकदा चुकून फोन लागला किंवा अगदी गंमत म्हणून काही जण कॉल करतात. परंतु कॉल आल्यावर प्रत्येक कॉलची घटनास्थळी धाव घेत शहानिशा करावी लागते. बुधवारी १९ कॉल आल्यावर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी जाऊन १९ वेगवेगळ्या प्रकारचे सरपटणारे जीव पकडून ताब्यात घेतले आहेत.

यात २ घोणस, ४ बिनविषारी पाणदिवड, २डुल्या नाग, ६ धामण, २ धूळनाग , ३ नाग अशा विषारी व बिनविषारी सापांचा समावेश आहे. या १९ सरपटणा-या जिवांना पकडून त्यांना वसई पूर्व येथील तुंगारेश्वर येथील जंगलात सोडण्यात आले आहे.उंदरांमुळे होते घुसखोरीवाढत्या मानवी वस्तीमूळे जंगले व डोंगर नष्ट होत चालली आहेत. नागरी वस्तीतून मोठ्या प्रमाणात उरलेले अन्न व खरकटे कचराकुंडीत फेकले जाते. त्यामूळे या खरकट्या अन्नावर मोठ्या प्रमाणात उंदिर पोसले जात असतात. या उंदरांच्या मागावर साप नागरी वस्तीत शिरू लागल्याची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांनी दिली.

टॅग्स :snakeसापVasai Virarवसई विरार