शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

वसई मंडलात दोन दिवसात 1600 वीज जोडण्याची तपासणी, 80 वीज चोरांविरुद्ध कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2020 23:19 IST

वीज चोरट्यांविरुद्धची मोहीम नियमित सुरु राहणार असून अधिकृत वीज जोडणी घेऊनच विजेचा वापर करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे. 

ठळक मुद्देअभियंते व कर्मचाऱ्यांच्या 55 जणांच्या विशेष पथकाने नालासोपारा पूर्व येथील संतोष भुवन, गौराई पाडा, वलई पाडा, मोरेगाव, हवाई पाडा, बिलालपाडा, यादव नगर, कारगिल, रहमान नगर, श्रीराम नगर आदी भागात कारवाई

वसई मंडल कार्यालयांतर्गत 55 अभियंता व कर्मचाऱ्यांच्या पथकाने दोन दिवसात 1600 वीज जोडण्याची तपासणी करून 80 वीज चोरांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला. मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली व अधीक्षक अभियंता राजेशसिंग चौहान यांच्या नेतृत्वाखाली ही कामगिरी करण्यात आली. वीज चोरट्यांविरुद्धची मोहीम नियमित सुरु राहणार असून अधिकृत वीज जोडणी घेऊनच विजेचा वापर करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे. 

अभियंते व कर्मचाऱ्यांच्या 55 जणांच्या विशेष पथकाने नालासोपारा पूर्व येथील संतोष भुवन, गौराई पाडा, वलई पाडा, मोरेगाव, हवाई पाडा, बिलालपाडा, यादव नगर, कारगिल, रहमान नगर, श्रीराम नगर आदी भागात विशेष तपासणी मोहिमेअंतर्गत वीज चोरी आणि अनधिकृत वीज वापर करणाऱ्यांवर कारवाई करण्यात केली. जवळपास 1600 वीज जोडण्यांची तपासणी करण्यात आली. 

त्यामध्ये एकूण 80 ठिकाणी वीज चोरी पकड्ण्यात आली. सुमारे एक लाख 60 युनिट विजेच्या चोरी प्रकरणी चोरीच्या विजेचे देयक आणि दंडाची रक्कम भरण्याची नोटीस देण्यात आली असून याला प्रतिसाद न देणाऱ्यांविरुद्ध तुळींज पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात येणार आहे. तर अनधिकृत वीज वापर करणाऱ्या 16 ग्राहकांना तीन लाख 74 हजारांचा दंड आकारण्यात आला आहे. तत्पूर्वी दि 1 ते 19 डिसेंबर दरम्यान संतोष भुवन, विजय नगर, तुळींज, नागिनदास पाडा, प्रगतीनगर, मोरेगाव, ओसवाल आदी भागात वीज चोरांविरुद्ध मोहिम राबवण्यात आली होती. यात 1100 वीजजोडण्या तपासण्यात आल्या. वीजचोरी आढळलेल्या 49 जणांना पाच लाख 72 हजारांचे वीजचोरीचे देयक व दंड आकारण्यात आला होता. यातील 16 जणांनी 3 लाख 21 हजार रुपयांचा भरणा केला असून इतरांविरुद्ध फिर्याद देण्याची प्रक्रिया सुरु आहे. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारelectricityवीज