- रविंद्र साळवे मोखाडा : यंदाची दिवाळी आदिवासी बांधवा सोबत या उपक्र मांतर्गत पालघर पोलिस अधिक्षक मंजुनाथ सिंगे, अप्पर पोलिस अधिक्षक योगेश चव्हाण व डी.वाय.एस.पी सुरेश घाडगे यांच्या आवाहनाला मोखाडा पोलिस स्टेशनचे प्रभारी पोलिस निरीक्षक प्रकाश सोनावणे, मोखाडा पोलिस कर्मचारी यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला स्वत:च्या पगारातून जमलेल्या निधीतून १५० साड्या गडचिरोली येथील आदिवासी महिलांसाठी पाठवून दिल्या त्यामुळे सर्वचस्तरातून त्यांचे कौतुक केले जात आहे गडचिरोली जिल्हातील भौगोलिक, आर्थिक व सामाजिक परिस्थिती ही महाराष्ट्रा समोर मोठे आव्हान असुन तेथील गोरगरिब आदिवासी बांधव पोटाची खळगी कशीतरी भरून जीवन जगत आहे तर नक्षलवादाची भयंकर समस्या याच गडचिरोली जिल्ह्यात पहावयास मिळते. अशा भयंकर परिस्थितीत आयुष्य जगणाºया आदिवासी बांधवाना मोखाडा पोलिस स्टेशन ने केलेली ही छोटीशी मदत त्यांच्या जीवनात मोठा आनंद निर्माण करणारी आहे. समाजात आणि देशात शांतता व सुव्यवस्था कायमस्वरुपी अबाधित रहावी सर्वानी सण - उत्सव साजरे न करणाºया पोलिस बांधवानी मंजुनाथ सिंगे यांच्या आवाहनामुळे सामाजिक बांधिलकी चे आणखी एक पाऊल पुढे टाकून गडचिरोली येथील आदिवासी बांधवाना केलेली ही मदत त्यांच्या अंधकामय जीवनात आनंदाचा प्रकाश निर्माण करणारी आहे.
मोखाडा पोलिसांनी पाठविल्या १५० साड्या,पगारातून गोळा केला निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 06:06 IST