शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

१५० सफाई कर्मचा-यांचा पगार कापला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 11:55 PM

महापालिकेच्या सफाई विभागात कर्मचारी म्हणून पालिकेत भरती झालेले साहेबांची खुर्ची बळकावून बसले आहेत

भिवंडी : महापालिकेच्या सफाई विभागात कर्मचारी म्हणून पालिकेत भरती झालेले साहेबांची खुर्ची बळकावून बसले आहेत. अशा कर्मचाºयांना मूळ जागी पाठवले असता त्यांनी शहर स्वच्छता न केल्याने आयुक्तांच्या आदेशानुसार त्यांचे १५ दिवसांचे पगार कापण्यात आले आाहेत.महापालिकेतील शहर सफाई विभागात सुमारे २४०० सफाई कर्मचारी असून त्यापैकी १५० पेक्षा अधिक सफाई कामगार आजी-माजी नगरसेवकांच्या आशीर्वादाने कार्यालयात खुर्ची बळकावून ‘साहेब’ बनले आहेत. पालिका आयुक्त योगेश म्हसे व स्वच्छतादूत महापौर जावेद दळवी यांनी शहरात स्वच्छता मोहीम सुरू केली आहे. त्याकरिता पालिकेचे मनुष्यबळ कमी असल्याचे आढळल्याने आयुक्त म्हसे यांनी स्वच्छता विभागाची झाडाझडती घेतली. तेव्हा सुमारे १५० सफाई कामगार पालिकेच्या विविध भागात काम करत असल्याचे आढळले. त्यामुळे या सफाई कामगारांना पालिकेच्या आस्थापना विभागामार्फत मूळ जागेवर काम करण्याचे आदेश बजावले.हे सफाई कामगार आजी-माजी नगरसेवक व तत्कालीन आस्थापना विभागाच्या अधिकाºयांशी संगनमत करून ‘साहेब’ बनले होते. त्यामुळे त्यांनी या आदेशाला न जुमानता थेट न्यायालयात जाण्याचा मार्ग अवलंबला. मात्र उच्च न्यायालयाने मागील महिन्यात या कामगारांना मूळजागी काम करण्याचा निर्णय दिला. मात्र त्यांनी या निर्णयाविरूध्द दाद मागण्यासाठी उच्च न्यायालयातील पुढच्या बेंचकडे दावा दाखल केला. त्यानुसार कामगारांना ‘जैसे थे’ स्थितीत राहण्यास सांगितले आणि २६ फेब्रुवारीला सुनावणी ठेवली आहे. या प्रकरणी पालिकेच्या वकील पॅनेलने कॅव्हेट दाखल न केल्याने कामगारांना पुढील न्यायालयात जाण्याची मुभा मिळाल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरू आहे.दरम्यान, आयुक्त योगेश म्हसे यांनी जे सफाई कामगार नियमीत हजेरी लावून मूळ जागेवर काम करीत नाही त्यांचा अहवाल सफाई विभागाकडून मागवला आहे. तसेच सफाई अधिकाºयांच्या अहवालानुसार अशा सफाई कामगारांचा १५ दिवसांचा पगार न देण्याचा निर्णय घेतल्याने सफाई कामगारांना चांगलीच चपराक बसली आहे. त्यामुळे पालिका कर्मचाºयांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.