पालघर : पालघरच्या वीरेंद्रनगर परिसरात खेळत असलेल्या ४ ते ९ वर्षे वयोगटांतील ११ मुलांनी बदामाच्या बिया समजून लेबाल्या फळाच्या बियांमधील गर खाल्ल्याने अत्यवस्थ अवस्थेत त्यांना पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.शुक्रवारी संध्याकाळी वीरेंद्रनगरमधील १) कृष्णा बिंद (६ वर्षे), फिरोज इस्लाम खान (४), फिरदोश इस्लाम खान (४), कांचन बिंद (८), नूर हसन शेख (५), तौसीफ अहमद सिद्दीकी (५), आदिल खान (४), अंजली कुमारी बिंद (७), खुशनुमा सिद्दीकी (९), अर्जुन कुमार बिंद (२), तौसीफ अहमद सिद्दीकी (५) ही मुले खेळून आपल्या घरी आल्यानंतर त्यांना उलट्या, चक्कर आणि जुलाब सुरू झाल्यानंतर वीरेंद्रनगरमधील बहुतांशी घरांतील लहान मुलांनादेखील उलटी, जुलाब सुरू झाल्याचे समजले. या मुलांना नेमके झाले तरी काय, हे कोणालाच समजून येत नसल्याने आईवडील, नातेवाइकांनी मिळेल ते वाहन पकडून त्यांना शुक्रवारी रात्री ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. या मुलांपैकी तौसीफ सिद्दीकी या ५ वर्षीय मुलाने आपण खेळत असताना बदामाच्या बियांतील गरासारखा पांढरा गर खाल्ल्याची माहिती दिली. त्यानंतर, वीरेंद्रनगरजवळील नर्सरी पांड्यामधील एका मैदानामध्ये जाऊन काही पालकांनी माहिती घेतली असता तेथील एका बदामाच्या झाडाखाली पडलेल्या बदामांतील गर ही मुले नेहमीच खात असत. शुक्रवारी काही मुलांनी बदामाच्या झाडाजवळच असलेल्या लेबाल्याच्या बियांतील गर खाल्ल्यानंतर त्यांना तो गोड लागल्याने तेथील सर्व मुलांनी तो गर खाल्ला.
११ मुलांना विषबाधा
By admin | Updated: February 21, 2016 02:32 IST