पारोळ : विरार पूर्वेकडील शिरसाड गावातील दीर्घायु दांम्पत्यापैकी खापरपणजोबा झालेले दाजी हरी राऊत (१०८) यांचे अल्पशा आजाराने शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या पाश्चात त्यांची पत्नी कमळीबाई (१०५), ७५ वर्षे वयीन सर्वात मोठ्या मुलासह सहा मुले दोन मुली, सुना, नातवंडे, नातसून, पतवंडे असा ६५ सदस्यांचा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा वाजत गाजत भजन गाऊन काढण्यात आली होती. त्यांच्या इच्छेनुसार त्यांचे शव त्यांच्याच खाजगी जागेत दहन करण्यात आले. (वार्ताहर)
१०८ वर्षीय दाजींचे निधन
By admin | Updated: February 13, 2017 04:45 IST