शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

इलेक्ट्रिक मालाच्या खरेदी-विक्रीत महिलेला १ कोटी ७ लाखांना लुबाडले

By धीरज परब | Updated: May 29, 2024 20:04 IST

भाईंदर पूर्वेला भाजी मार्केट गल्लीतील अशोक भवन येथे त्यांचे कार्यालय आहे.

मीरारोड - इलेक्ट्रिक साहित्याच्या खरेदी-विक्रीत एका महिलेची १ कोटी ७ लाख रुपयांना फसवणूक केल्या प्रकरणी भाईंदरच्या नवघर पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोरिवलीच्या फॅक्टरी लेन येथील गोकुळ गगन इमारतीत राहणाऱ्या सोनल तेजस शहा यांचा इलेक्ट्रॉनिक वस्तू व पार्टचा व्यवसाय आहे. भाईंदर पूर्वेला भाजी मार्केट गल्लीतील अशोक भवन येथे त्यांचे कार्यालय आहे. दिल्ली येथील खन्ना इंडस्ट्रीजच्या नेहा खन्ना यांनी ६ हजार एलईडी टीव्ही पुरवण्याची हमी दिली होती. २ कोटी रुपयांपैकी ६५ लाख रुपये हे शाह यांनी खन्ना यांना आगाऊ रक्कम म्हणून दिले होते. परंतु त्यांनी शाह यांना ठरल्या प्रमाणे माल दिलाच नाही. 

तर उत्तर प्रदेशच्या नोयडा येथील अकबरा इलेक्ट्रिकल प्रायव्हेट लिमिटेडचे चंद्रशेखर चोहान व अपूर्वा शर्मा यांनी इलेक्ट्रिक मालाच्या बदल्यात देय असलेली ४२ लाख रुपयांची रक्कम दिली नव्हती. चंद्रशेखर चौहान व अपूर्वा शर्मा तसेच  नेहा खन्ना यांनी आपसात संगनमत करून कटकारस्थान रचून १ कोटी ७ लाख रुपयांची फसवणूक केली अशी फिर्याद सोनल शहा यांनी नवघर पोलीस ठाण्यात दिली.  त्या अनुषंगाने नवघर पोलिसांनी २८ मे रोजी गुन्हा दाखल केला आह. २०१८ ते २०२० दरम्यान हा सर्व प्रकार घडला असून लाखोंची रक्कम हि हवाला मार्फत पाठवण्यात आल्याची शक्यता वर्तवली जात आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक धीरज कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक निवास गारळे हे अधिक तपास करत आहेत. 

टॅग्स :mira roadमीरा रोडCrime Newsगुन्हेगारी