शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

झेडपीत ‘कोटपा’ला हरताळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 23:45 IST

जिल्ह्यात सर्वत्र तंबाखू नियंत्रण कार्यक्रम (कोटपा अ‍ॅक्ट) प्रभावीपणे राबविला जात आहे. शासकीय कार्यालयातही याची अंमलबजावणी होत असताना जिल्हा परिषदेने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे.

ठळक मुद्देकायदा बासनात : अधिकारी, पदाधिकाऱ्यांचं चांगभलं

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात सर्वत्र तंबाखू नियंत्रण कार्यक्रम (कोटपा अ‍ॅक्ट) प्रभावीपणे राबविला जात आहे. शासकीय कार्यालयातही याची अंमलबजावणी होत असताना जिल्हा परिषदेने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे येथे सिगारेटचा धूर, खर्रा व पानाच्या पिचकाऱ्या उडविल्या जात आहे. काही अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या हितासाठीच झेडपीत कोटपा कायदा बासनात गुंडाळल्याचे दिसून येते.कोटपा कायद्यातील विविध कलमान्वये सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणे व थुंकणे, तंबाखुजन्य पदार्थाच्या विक्रीची अप्रत्यक्ष व प्रत्यक्ष जाहिराती करणे, शाळा किंवा संस्थेच्या शंभर यार्ड परिसरात तंबाखूजन्य पदार्थाची विक्री व १८ वर्षाखालील मुलांना तंबाखूजन्य पदार्थाची विक्री अथवा खरेदी याविरुद्ध दंडात्मक कारवाईचे प्रावधान आहे. शासकीय कार्यालयात तंबाखूजन्य पदार्थाचे सेवक करताना आढळल्यास २०० रुपये दंडाची आकारणी करण्याचे आदेश आहेत.यासंदर्भात शासकीय कार्यालयात फलकही लावण्यात आले आहे. काही कार्यालयात दंड आकारून ती रक्कम कोषागार कार्यालयात जमाही केली. जिल्हा परिषदेत कारवाईचे फलक लावले, परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही. काही पदाधिकारी व अधिकारी स्वत:च धूम्रपान करतात. काही तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करून व पान खाऊन कार्यालयातच पिचकाऱ्या मारतात.कर्मचारीही त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत असल्याने ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ अशा स्थितीत जिल्हा परिषदेत कोटपा कायद्याची वाट लागली आहे. त्यामुळे याला पायबंद घालून कोटपा कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी सहकार्य करण्याची गरज व्यक्त होत आहे.भिंती चकाचक; पण गॅलरी व बेसिन रंगलेलेचजिल्हा परिषदेत पूर्वी भिंती पिचकाऱ्यांनी रंगलेल्या दिसून येत होत्या. परंतु, त्या भिंती रंगवून चकाचक करण्यात आल्या. तसेच धूम्रपान केल्यास २०० रुपये दंडाच्या कारवाईचे सूचना फलक भिंतीवर लावले. त्यामुळे भिंती आता चकाचक दिसत असल्या तरी तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन बंद झाले नाही. परिस्थिती ‘जैसे थे‘च असून आता इमारतीची गॅलरी, कोपरे व स्वच्छतागृहातील बेसिन कोटपा कायद्यांच्या अंमलबजावणीचे वास्तव दर्शवित आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषद