शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

झुडपी जंगल होणार ‘आॅक्सिजन पार्क’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 23:38 IST

पर्यावरणाचा समतोल टिकविणे, वाढते प्रदूषण थांबविणे आणि तापमान वाढ कमी करण्यासाठी ५० कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम राज्य शासनाने हाती घेतला आहे. यावर्षी जिल्ह्याला २६ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट मिळाले आहे.

ठळक मुद्दे२६ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट : संगोपनाचे मॉडेल तयार करणार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पर्यावरणाचा समतोल टिकविणे, वाढते प्रदूषण थांबविणे आणि तापमान वाढ कमी करण्यासाठी ५० कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम राज्य शासनाने हाती घेतला आहे. यावर्षी जिल्ह्याला २६ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट मिळाले आहे. यंदा बहुतांश वृक्ष लागवड जिल्ह्यातील झुडपी जंगलावर करण्यात येणार असून त्यांना ‘आॅक्सिजन पार्क’, असे संबोधण्यात येणार आहे.मागील दोन वर्षांपासून १ ते ७ जुलै दरम्यान महावृक्ष लागवडीचा कार्यक्रम घेण्यात येतो. हे तिसरे वर्ष असून यावर्षी राज्यात १३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. त्याचाच भाग म्हणून जिल्ह्यात २६ लाख ७७ हजार ३४० वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यावर्षी प्रत्येक तालुक्यात ५० हजार वृक्ष लागवडीचा एक गट निवडण्यात येईल. झाडे टिकविण्यासाठी तिथे कुंपण व पाण्याची व्यवस्था करण्यात येईल. झाडांना पाणी व खत देण्यासाठी म.गां.रोहयोमधून मजूर लावण्यात येणार आहेत. उपविभागीय अधिकारी व वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्याकडून झुडपी जागेची निवड करण्यात येणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक गावात एक हजार वृक्ष लागवड होईल, अशी जागा ग्रामपंचायतीने निवडून त्यावर वृक्ष लागवड करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत.१० हजारांच्या वर एका ठिकाणी वृक्ष लागवड करणाऱ्या विभागाने त्या ठिकाणी पाणी, कुंपण व पाणी देण्यासाठी मजुराची व्यवस्था, अशा पद्धतीने मॉडेल तयार करूनच काम करण्याच्या सूचना जिल्हाधिकाºयांनी आज झालेल्या वृक्ष लागवड बैठकीत दिल्या. स्वयंसेवी संस्थांनी जमिनीचे मोठे पट्टे निवडून वृक्ष लागवड करावी. कोणत्या विभागाकडे वा संस्थेकडे वृक्ष लावण्यासाठी जमीन नसल्यास जमिनीची मागणी करावी, अशी सूचना जिल्हाधिकाºयांनी केली. तेथील लोकांच्या उपयोगात येतील, असे वृक्ष लावण्यात यावे. वृक्ष लागवडीसाठी खड्डे खोदण्याचे काम कमी झाले आहे. मे अखेरपर्यंत सर्व मोठ्या विभागांनी ८० टक्के काम पूर्ण करावे, असेही त्यांनी सांगितले. बैठकीला जि.प. सीईओ अजय गुल्हाणे, उपवनसरंक्षक सुनील वर्मा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी करुणा जुईकर, इतर विभाग प्रमुख व स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.विभागनिहाय वृक्ष लागवडीचे उद्दिष्टविभागनिहाय वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यात वनविभाग ७ लाख ९५ हजार, सामाजिक वनीकरण ५ लाख, जि.प. ६ लाख २९ हजार ८८०, शालेय शिक्षण १ लाख २२ हजार ८०, कृषी विभाग ३ लाख १२ हजार ६२५, जलसंपदा १ लाख ७ हजार ५३५, गृह विभाग ४१ हजार ९०, सार्वजनिक बांधकाम ३८,११०, नगर विकास २०,६७५, जलसंधारण निम्न वर्धा २४,८१०, पाणी पुरवठा व स्वच्छता २०,३३०, इतर विभाग ६५,२०५ असे एकूण २६ लक्ष ७७ हजार ३४० वृक्षांचे उद्दिष्ट आहे.