समुद्रपूर : तालुक्यातील कानकाटी (कांढळी) येथील घरकुलाचे पैसे थांबविल्याचे व अतिक्रमण घराचा वाद चांगलाच चिघळला. यात अतिक्रमणधारकाने येथील जिल्हा परिषद सदस्याच्या घरावर हल्ला करीत गाड्यांची तोडफोड केली. याची माहिती गावकऱ्यांना मिळताच त्यांनी हल्लेखोराचे घर जाळण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातवारण आहे. ही घटना गुरुवारीह रात्री कानकाटी येथे घडली.सविस्तर वृत्त असे की, कानकाटी येथील युवराज कारमोरे यांचे काही घर अतिक्रमण जागेवर आहे. यामुळे ग्रामपंचायतीने सदर घर पाडण्याचा प्रयत्न केला. ते प्रकरण न्यायालयात गेल्याने त्याला स्थगिती मिळाली. त्यामुळे सरपंचाचे पती बलराम राऊत व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य योगेश फुसे यांचे संबंध तणावपूर्ण झाले. त्यातच खोटी तक्रार करीत गावातील दोन घरकुलाचे हप्ते थांबविण्या संदर्भात चौकशी करीता गुरुवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास पंचायत समितीचे अधिकारी कानकाटी येथे आले. त्यावेळी युवराज कारमोरे व बलराज राऊत यांच्यात पुन्हा वाद निर्माण झाला. त्यामध्ये हाणामारी झाल्याने दोघांनी समुद्रपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याने दोघावरही पोलिसांनी गुन्हे दाखल केले.यातच संध्याकाळी ७ वाजता दरम्यान युवराज, प्रमोद व रामहरी कारमोरे यांच्यासह चंद्रमणी मेश्राम इत्यादींनी नागपूरवरून दोन ते तीन वाहनामध्ये २० च्या वर युवक आणले. त्यांनी जिल्हा परिषद सदस्य रीना फुसे यांच्या घरावर हल्ला चढवित आवारामध्ये असलेली कार व मोटार सायकलची लोखंडी रॉडने तोडफोड केली. खिडक्याच्या तावदानाची तोडफोड योगेश फुसे याला मारहाण केली. याची माहिती गावकऱ्यांना होताच त्यांनी या हल्लेखोरांना पिटाळून लावले. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी हल्लेखोर कारमोरे कुटुंबाकडे वळविला. त्यामध्ये त्यांनी कार व दुचाकी पेटवित घरही जाळण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये कार व दुचाकी जळून खाक झाली. कारमोरे यांच्या घरातील सोफासेट, दिवान, टीव्ही, सिलिंग फॅन पेटवून दिल्याने त्यांचे अंदाजे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार रणजितसिंह चव्हाण, पी.एस.आय. चेतन मराठे, हवालदार उमेश हरणखेडे सह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. दोघांनीही एकमेकाच्या विरूद्ध तक्रारी दाखल केल्याने योगेश फुसे अधिक नऊ जणांविरूद्ध १४३, ४४८, ४३५, ४३६ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले तर युवराज, प्रमोद, रामहरी, कारमोरे, चंद्रमणी मेश्राम अधिक २५ व्यक्तीवर १४३, १४७, १४८, १४९, ३०७,४२७, ४४८ कलमानुसार गुन्हे दाखल आहे. कानकाटी येथे शुक्रवारी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. अप्पर पोलीस अधीक्षक स्मिता पाटील उपविभागीय अधिकारी वासुदेव सुर्यवंशी यांनी भेट दिली असून परिस्थिती नियंत्रणात आहे.(तालुका प्रतिनिधी)जि.प. सदस्य नॉट आन्सरिंग४या संदर्भात जि.प. सदस्य रीना फुसे व माजी जि.प. सदस्य योगेश फुसे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा भ्रमणध्वनी नॉट आन्सरिंग असा संदेश देत होता. यामुळे त्यांच्याशी संपर्क होवू शकला नाही. अतिक्रमणाचा वाद चिघळला ४निम्मे घर अतिक्रमणात असल्याच्या कारणावरून गावातील युवराज कारमोरे व जि.प. सदस्याचा पती योगेश फुसे यांच्यात वाद होता. हा वाद विकोपाला गेल्याने हा प्रकार घडल्याची चर्चा आहे. बाहेरून आले हल्लेखोर ४फुसे व कारमोरे यांच्यात असलेल्या वादाचा वचपा काढण्याकरिता जि.प. सदस्य रीना फुसे यांच्या घरावर हल्ला करण्यात आला. हा हल्ला करण्याकरिता आलेले हल्लेखोर बाहेर गावाहून आल्याची माहिती आहे. गावाला छावणीचे स्वरूप ४कानकाटी गावात झालेल्या या प्रकारामुळे येथे चोख पोलीस बंदोबस्त ठेप्ण्यात आला होता. यामुळे गावाला छावणीचे स्वरूप आले होते.
जि.प. सदस्याच्या घरावर हल्ला
By admin | Updated: January 2, 2016 08:35 IST