शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

जि.प.च्या रेहकी शाळेत विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 00:31 IST

शिक्षणाच्या दर्जाबाबत नेहमीच चर्चेत असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळांत आता शिपायाचे काम करून घेत असल्याचा प्रकार रेहकी येथील शाळेत उघड झाला आहे.

ठळक मुद्देमुख्याध्यापिका शिक्षणाऐवजी भरायला लावते पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : शिक्षणाच्या दर्जाबाबत नेहमीच चर्चेत असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळांत आता शिपायाचे काम करून घेत असल्याचा प्रकार रेहकी येथील शाळेत उघड झाला आहे. येथील मुख्याध्यापिका मंगला कुबडे यांनी या चिमुकल्या विद्यार्थ्यांना थेट रस्ता ओलांडून पाणी आणण्यास सांगितले. यावेळी एखादा अपघात घडला तर त्याची जबाबदारी कोणाची असा प्रश्न निर्माण झाला आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की, रेहकी येथील जि.प.च्या प्राथमिक शाळेत सोमवारी मुख्याध्यापिका कुबडे यांच्या आदेशानुसार दोन विद्यार्थ्यांना नळावरून पाणी आणण्याचे सांगण्यात आले. त्यानुसार विद्यार्थ्यांनी दोन बादली घेतल्या व पाणी आणने सुरू केले. विद्यार्थ्यांनी शाळेला लागूनच असलेल्या सेलू ते येळाकेळी या मुख्य रहदारीचा रस्ता ओलांडत पाणी आणायला सुरुवात केली. तेव्हा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू होती. या रस्त्याचे रूंदीकरण व डांबरीकरणाचे काम सुरू असल्याने ठिकठिकाणी दगड व गिट्टीचा चुरा आहे. या परिस्थितीत अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. ज्या वेळी विद्यार्थी पाणी आणत होते नेमके त्याच वेळी येळाकेळी येथून टिप्पर येत असल्याचे पाहून विद्यार्थ्यांची घाबरगुंडी उडाली व त्यांनी जीव वाचविण्यासाठी पळापळ सुरू केली. यात जर एखादी घटना घडली तर त्याची जबाबदारी कोणाची असा प्रश्न पालकांनी विचारला आहे.हा प्रकार सुरू असताना शिक्षिका कमरेवर हात ठेवून तमाशा पहात होत्या हे विशेष.. शाळेत शिक्षणासाठी येणाºया विद्यार्थ्यांना शिक्षणाऐवजी शिपायाचे कामे सांगुन विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात टाकणाºया या शिक्षकांसह मुख्याध्यापिकेबाबत पालक वर्गाकडुन संताप व्यक्त केला जात आहे. मुख्य रहदारीचा रस्ता ओलांडून विद्यार्थ्यांना पाणी आणायला लावणाºया त्या मुख्याध्यापिकेवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.आम्ही सर्व शिक्षक आपआपल्या वर्गात अध्यापनाचे कार्य करीत होतो. दोन मुलांनी शौचास जाण्यासाठी सुटी मागितली, शाळेतील नळ आले नसल्याने पाणी आणण्यासाठी मुले शाळेसमोरील नळावर गेले, आम्ही कुणीही त्यांना शाळेत पाणी भरायला लावले नाही.- मंगला कुबडे, मुख्याध्यापिका, जि. प. उच्च प्राथमिक शाळा, रेहकी.विद्यार्थ्यांना रस्ता पार करून पाणी आणायला लावणे चुकीचे आहे, नेमका काय प्रकार आहे याची चौकशी करण्याच्या सूचना विस्तार अधिकºयांना देतो. यात कुणाची चुक आढळल्यास संबधित दोषीवर कारवाई केली जाईल.- संजय वानखेडे, गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती, सेलू