शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

वर्ध्यात एसएओ कार्यालयास युवा परिवर्तनच्या आंदोलनकर्त्यांनी ठोकले कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2020 16:18 IST

Agitation Wardha News परिवर्तन की आवाजच्या पदाधिकाऱ्यांना अजय राऊत नामक अधिकाऱ्याने असभ्यतेची वागणूक दिली. त्यानंतर संतप्त आंदोलनकर्त्यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाला कुलूप ठोकले.

ठळक मुद्देनोंदविला शेतकरी विरोधी धोरणांचा निषेधअनिल इंगळेंसह अजय राऊत यांची बदली करा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: खरीप हंगामाच्या सुरूवातीला जिल्ह्यात सोयाबीनच्या बोगस बियाण्यांची विक्री झाली. परिणामी, अनेक शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करीत दुबार पेरणी करावी लागली. बोगस बियाणे विक्रेत्या कंपन्यांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी दिले होते. पण पंधरा दिवसांचा कालावधी लोटूनही कुठलीही कार्यवाही करण्यात आली नसल्याने बुधवारी जाब विचारण्यासाठी गेलेल्या युवा परिवर्तन की आवाजच्या पदाधिकाऱ्यांना अजय राऊत नामक अधिकाऱ्याने असभ्यतेची वागणूक दिली. त्यानंतर संतप्त आंदोलनकर्त्यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाला कुलूप ठोकले. या आंदोलनामुळे या कार्यालयातील कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली होती.

सोयाबीनचे बोगस बियाणे विक्री करणाऱ्या कंपन्यांवर फौजदारी कारवाई करण्यात यावी. सततच्या पावसामुळे सोयाबीन आणि कापूस उत्पादकांचे मोठे नुकसान झाल्याने सर्वेक्षण करून नुकसानग्रस्तांना शासकीय मदत मिळून द्यावी, अशी मागणी यापूर्वी निवेदन देऊन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांकडे करण्यात आली. सदर निवेदन स्विकारताना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे यांनी निवेदनकर्त्यांना येत्या दहा दिवसांत या दोन्ही प्रमुख मागण्यांवर सहानुभूतीपूर्वक विचार करून बोगस बियाणे विक्री करणाऱ्या कंपन्यांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे ठोस आश्वासन दिले होते. सदर आश्वासन देऊन पंधरा दिवसांचा कालावधी लोटला तरी कुठलीही कार्यवाही न झाल्याने युवा परिवर्तन की आवाजच्या पदाधिकाऱ्यांनी युवा परिवर्तन की आवाजचे संस्थापक अध्यक्ष निहाल पांडे यांच्या नेतृत्त्वात बुधवारी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. पण जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारीच कार्यालयात नसल्याने आंदोलनकर्त्यांच्या मागण्या जाणून घेण्यासाठी आलेले उपविभागीय कृषी अधिकारी अजय राऊत यांनी आंदोलनकर्त्यांनाच असभ्य वागणूक दिल्याने संतप्त आंदोलनकर्त्यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाला कुलूप लावून निषेध नोंदविला. याप्रसंगी आंदोलनकर्त्यांनी आश्वासन न पाळणाऱ्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे, उपविभागीय कृषी अधिकारी अजय राऊत यांची तातडीने गडचिरोली येथे बदली करण्याची मागणी रेटली.आंदोलनकर्त्यांचा पारा चढलापंधरा दिवसांपूर्वी दिलेल्या आश्वासनांचे काय झाले याची माहिती जाणून घेण्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात आलेल्या आंदोलनकर्त्यांना दोषीच्या कटघऱ्यात उभे करून असभ्यतेची वागणूक देण्यात आली. उपविभागीय कृषी अधिकारी अजय राऊत हे एकेरी भाषेचा वापर करीत असल्याचे लक्षात येताच आंदोलनकर्त्यांचा पारा चढला आणि संतप्तांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाºयांच्या दालनातील खूर्च्या फेकून कृषी विभागाच्या दुर्लक्षीत धोरणांचा निषेध नोंदविला.पोलीस निरीक्षकांनी उघडले कुलूपआंदोलनाची माहिती मिळताच रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनाजी जळक ते यांच्या सहकार्यांसह जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात दाखल झाले. पोलिसांचे शासकीय वाहन बघताच आंदोलनकर्त्यांनी स्वत: पुढाकार घेवून शासकीय वाहनात बसले. त्यानंतर जळक यांनी आंदोलनकर्त्यांसोबत सकारात्मक चर्चा करून कुलूपाची चाबी स्वत: जवळ घेत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाचे कुलूप उघडले.आंदोलनकर्ते रामनगर पोलिसांच्या ताब्यातजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्यांना रामनगर पोलिसांनी ताब्यात घेवून पोलीस स्टेशनमध्ये आणून स्थानबद्ध केले. या प्रकरणी दुपारी ४ वाजेपर्यंत कुठलीही तक्रार कृषी विभागाकडून पोलिसांत दाखल करण्यात आली नव्हती.

 

टॅग्स :agitationआंदोलन