शहरं
Join us  
Trending Stories
1
Revanth Reddy : "राहुल गांधी पंतप्रधान असते तर त्यांनी PoK परत आणला असता"; रेवंत रेड्डी यांचा मोदींवर निशाणा
2
भयंकर! पंजाबमधील फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट; ५ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
दे दणादण! IRS अधिकारी आपापसात भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; ऑफिसमध्ये तुफान राडा
4
काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली
5
आजचे राशीभविष्य: शुक्रवार 30 मे 2025; शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, नोकरी-व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल
6
लोन मिळवून देण्याच्या नावावर सर्वाधिक लोकांना लागलाय चुना, गमावलेत ₹३३,१४८ कोटी
7
"अकाऊंट हॅक झालेलं तर गप्प का बसलात?" सुदेश म्हशिलकरांच्या स्पष्टीकरणानंतर प्राचीचा सवाल, म्हणाली...
8
पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली
9
महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये, महायुती म्हणून एकत्र लढणार : चंद्रशेखर बावनकुळे
10
पाकिस्तानी हेराचा हनी ट्रॅप; अभियंत्याला ठाण्यात अटक, डॉकयार्डमध्ये होता अभियंता
11
थकला-भागला 'विक्रम'; हमीभाव ठरविण्याची एकूण प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात
12
जोर ओसरतोय, पेरणीची घाई नको, ५ ते ६ दिवस पावसाची तीव्रता कमी असेल
13
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री
14
ईडीच्या उपसंचालकांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले; नेमकं प्रकरण काय?
15
वैष्णवी तर गेलीच आहे, आता वाईट बोलू नका; वडिल अनिल कस्पटेंच्या भावनांचा बांध फुटला
16
Vinayak Chaturthi 2025: सद्गुरू वामनराव पै सिद्धीविनायकाकडे काय मागावं हे सांगताहेत!
17
RCB vs PBKS : कोहलीचं सेलिब्रेशन बघून अनुष्का शर्माला आलं हसू; तो व्हिडिओ होतोय व्हायरल
18
धारावीत निम्मी जागा सार्वजनिक वापरासाठी; उर्वरित जागेत पुनर्वसन, नूतनीकरणाचे होणार काम
19
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली महिलेची १ कोटी ८१ लाखांची फसवणूक; गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळीचा पर्दाफाश

विजेच्या खांबावरच युवकाचा मृत्यू

By admin | Updated: June 17, 2016 02:29 IST

विजेच्या खांबावर बिघाड दुरूस्त करताना लागलेल्या धक्क्याने येथील युवकाचा खांबावरच मृत्यू झाला.

टाकरखेड : विजेच्या खांबावर बिघाड दुरूस्त करताना लागलेल्या धक्क्याने येथील युवकाचा खांबावरच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. राजेंद्र लक्ष्मण मोहोड (२८) रा. टाकरखेड असे मृतक युवकाचे नाव आहे. राजेंद्र मोहाडे हा वीज उपकरणे दुरूस्ती करण्यासह नांदपूर विद्युत कार्यालयाअंतर्गत वीज वितरण कंपनीचे खासगीत कामही करीत होता. गावातील अशोक चौधरी यांच्या घरचा विद्युत पुरवठा खंडित झाल्याची माहिती राजेंद्रला दिली. यावर राजेंद्रने कुठलीही शहानिशा न करता खांबावर चढून बिघाड दुरूस्त करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, त्याचा जिवंत ताराला स्पर्श झाल्याने घटनास्थळीच मृत्यू झाला. राजेंद्रचा एका वर्षापूर्वीच विवाह झाला होता. घटनेची माहिती मिळताच विद्युत वितरण कंपनीचे विभागीय उपअभियंता राजेश जयस्वाल, ठाणेदार अशोक चौधरी यांनी घटनास्थळ गाठत पंचनामा करून मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. राजेंद्रच्या मृत्यूने त्याचा परिवार उघड्यावर आल्याने त्यांना महावितरण कंपनीच्यावतीने मदत देण्याची मागणी जोर धरत आहे.(वार्ताहर)