गावाच्या विकासाकरिता युवकांची एकजुट आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 11:15 PM2018-01-13T23:15:35+5:302018-01-13T23:16:13+5:30

खेळामुळे युवकांमध्ये सांघिक भावना निर्माण होते. यामुळे गावोगावी विविध खेळांच्या स्पर्धा घेण्यात याव्या. जेणेकरून युवकांमध्ये एकीचे बळ निर्माण होईल आणि या एकजुटीतूनच गावाचा विकासही साधता येईल, असे मत माजी राज्यमंत्री तथा आ. रणजीत कांबळे यांनी व्यक्त केले.

The youth need to unite for the development of the village | गावाच्या विकासाकरिता युवकांची एकजुट आवश्यक

गावाच्या विकासाकरिता युवकांची एकजुट आवश्यक

googlenewsNext
ठळक मुद्देरणजीत कांबळे : सोनेगाव (बाई) येथील कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : खेळामुळे युवकांमध्ये सांघिक भावना निर्माण होते. यामुळे गावोगावी विविध खेळांच्या स्पर्धा घेण्यात याव्या. जेणेकरून युवकांमध्ये एकीचे बळ निर्माण होईल आणि या एकजुटीतूनच गावाचा विकासही साधता येईल, असे मत माजी राज्यमंत्री तथा आ. रणजीत कांबळे यांनी व्यक्त केले.
देवळी तालुक्यातील सोनेगाव (बाई) येथे आयोजित कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. सोनेगाव (बाई) येथे जय गुरुदेव क्रीडा मंडळाद्वारे ५८ किलो वजनगटातील कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटन कार्यक्रमाला देवळी ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर, हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती हरीश वडतकर, अजय बाळसराफ, माजी पं.स. सदस्य अशोक सराटे, माणिक इंगळे, मनीष थूल, उपसरपंच संजय लोखंडे, ग्रा.पं. सदस्य महेंद्र धोपटे, माजी सरपंच अण्णाजी गोटे, गुणवंत धांदे, डॉ. नरेंद्रकुमार इंगोले, बाबाराव झाडे, संदीप आडकीने, रामकृष्ण उईके आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
आ. कांबळे पूढे म्हणाले की, कबड्डी हा खेळ दरम्यानच्या काळात दुर्लक्षित झाला होता; पण आता पुन्हा युवकांचा कल या खेळाकडे वाढला आहे. गावोगावी कबड्डी स्पर्धेचे आयोजन होत आहे. सोनेगावातही युवकांनी मागील पाच ते सहा वर्षांपासून कबड्डी स्पर्धेचे आयोजन करून मातीतील खेळाला प्रोत्साहन दिले आहे. यापूढेही ही स्पर्धा अशीच घेत राहावी. यासाठी आपण मदत करू, असे आश्वासन त्यांनी दिले. शिवाय सुदृढ आरोग्य या हेतूने युवकांनी गावोगावी व्यायामशाळा निर्माण करावी, त्यासाठीही सहकार्य केले जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. आनंद इंगोले यांनी केले. संचालन अ‍ॅड. मंगेश घुंगरुड यांनी केले तर उपस्थितांचे आभार माजी सरपंच चंद्रशेखर आडकीने यांनी मानले. सदर स्पर्धेत पंच म्हणून कबड्डीपटू गौतम गोटे, दीपक वैद्य व डॉ. अमर नाखले जबाबदारी सांभाळत आहेत. कार्यक्रमाला गावातील नागरिक तसेच जय गुरुदेव क्रीडा मंडळाचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चिमुकला समालोचक ठरला कार्यक्रमाचे आकर्षण
कोणतीही स्पर्धा रोमांचक करण्यासाठी जशी खेळाडूंची आवश्यकता असते, तशी समालोचकाचीही भूमिका महत्त्वाची असते. उद्घाटन सामन्याप्रसंगी आ. रणजीत काबळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी गावातील प्रज्वल वानखेडे या आठव्या वर्गात शिकणाºया चिमुकल्याने हातात माईक घेतला आणि समालोचन सुरु केले. एकीकडे कबड्डीचा सामना रंगत असताना तेवढेच रंगतदार समालोचन हा चिमुकला करु लागल्याने सर्व मान्यवरांचे लक्ष त्याच्याकडे वळले. समयसूचकता व प्रत्येक क्षणाला त्याची शब्दफेक पाहून सर्वांनाच त्याचे कौतुक केल्याशिवाय राहवले नाही. गावात क्रिकेट सामने असो वा कबड्डीचे सामने त्यात हा चिमुकला समालोचक आपली भूमिका बजावत असल्याचे गावकरी सांगतात.

Web Title: The youth need to unite for the development of the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.