शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
3
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
4
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
5
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
6
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
7
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
8
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
9
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
10
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
11
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
12
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
13
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
14
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
15
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
16
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
17
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
18
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
19
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
20
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा

विविध शाळा-महाविद्यालये व शासकीय कार्यालयांत योग दिन कार्यक्रम

By admin | Updated: June 22, 2015 01:49 IST

जिल्ह्यात सर्वत्र प्रथमच योग दिन साजरा करण्यात आला. शाळा-महाविद्यालयांबरोबरच सर्वच शासकीय कार्यालये, ....

वर्धा : जिल्ह्यात सर्वत्र प्रथमच योग दिन साजरा करण्यात आला. शाळा-महाविद्यालयांबरोबरच सर्वच शासकीय कार्यालये, ग्रामपंचायती आणि सेवाभावी संस्थांच्यावतीनेही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी विविध योगासने करण्यात आली. प्रशिक्षकांनी योगासनावर मार्गदर्शनही केले. जे. बी. सायन्स कॉलेजवर्धा : राष्ट्रीय छात्र सेना बटालियनतर्फे जानकीदेवी बजाज विज्ञान महाविद्यालयाच्या प्रांगणात पहिला योग दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला महाराष्ट्र एनसीसी बटालियनचे समादेशक अधिकारी कर्नल राजेंद्र सिंग, एनसीसी आॅफिसर लेफ्टनंट प्रा. मोहन गुजरकर, लेफ्टनंट राजेश डंभारे, लेफ्टनंट प्रवीण ठाकरे, कॅप्टन राहुल भालेकर, मधुकर जोशी, अशोक टवले, गोपाल खंडागळे, नरेश नरेश बांगडे, विजय जुगनाके, अरुण हुड, अनंत खिराळे, सुभाष गुजरकर यांच्यासह छात्रसैनिक सहभागी झाले होते. यशवंत विद्यालयसेवाग्राम : यशवंत विद्यालय, हमदापूर येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक देविदास भोंग यांनी योगासनावर मार्गदर्शन केले. आजच्या धकाधकीच्या जीवनात आसन व प्राणायामाची गरज प्रकर्षाने जाणवत असून उत्तम आणि निरोगी जीवनासाठी आसन व प्राणायाम सर्वांनी गरजही त्यांनी व्यक्त केली. याप्रसंगी विविध योगासने आणि प्राणायाम करण्यात आले. पर्यवेक्षक अशोक केंडे, प्रभाकर महाजन, श्रीराम पातोंड, दिलीप जरोदे, माणिक सिंगन, दिलीप चव्हाण, शशिकांत सानप, संजय भगत, शरद वंगळ, सिद्धार्थ, गणेश कोचे, सुरेश मांडवकर, गजानन देशमुख, राज बावणे आदीं सहभागी झाले होते. सेवाग्राम आश्रमसेवाग्राम : आश्रम प्रतिष्ठानच्या यात्री निवास सभागृहात जागतिक योगदिनानिमित्त योगदिन व योग शिबिर घेण्यात आले. कार्यक्रमाला गांधी विचार परिषदचे भरत महोदय, योग प्रशिक्षक मारोतराव मुडे व कान्हाजी तिमांडे उपस्थित होते. दैनंदिन जीवनात करावयाची आसने, प्राणायाम याचे महत्त्व यावेळी उपस्थितांनी विषद केले. संचालन जालंधरनाथ यांनी केले. आभार बाबा खैरकार यांनी मानले. डॉ. शिवचरण ठाकूर , प्रा. अशोक मेहेर, विनायक ताकसांडे, अशोक गिरी, यांसह आश्रम व नई तालीम समितीचे कार्यकर्ते, कस्तुरबा व कासाबाई नर्सिंग विद्यालयाच्या विद्यार्थिनी, रमाबाई विद्यालयाचे शिक्षकवृंद व नागरिक सहभागी होते. सनशाईन हायस्कूल वर्धा : सनशाईन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात जागतिक योग दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी शिक्षक, विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी सामूहिकरित्या योगासने केली. यावेळी संस्थाध्यक्ष तबस्सुम आझमी, मुख्यध्यापक रुक्साना खत्री यांनी योगासनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजवून सांगितले. योग शिक्षक स्वप्नील सहारे, शिक्षिका कल्पना कोंबे यांनी विविध योग प्रकार विद्यार्थ्यांकडून करवून घेतले. विद्यार्थ्यांनी घेतले योगाचे धडेवर्धा : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शिववैभव कार्यालयात योग शिबिर घेण्यात आले. यावेळी मनोज परघन यांनी विद्यार्थ्यांना योग प्रशिक्षण दिले. योग शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी चंदन, अमर परघन, स्वप्नील बागेश्वर, नीता गुजर आदींनी सहकार्य केले.नवभारत अध्यापक विद्यालयवर्धा : नवभारत अध्यापक विद्यालय व जगजीवनराम माध्यमिक विद्यालयाच्या परिसरात आंतरराष्ट्रीय योग दिवस पार पडला. याप्रसंगी प्राचार्य सुनील गावंडे यांनी सुदृढ शरीर व निरोगी मनासाठी योग सर्वोत्तम असून भारतीय योग हा आंतरराष्ट्रीय शांतता व चांगले विश्व निर्माण करणारा ठरेल असे विचार व्यक्त केले. मुख्याध्यापक सतीश कराळे यांनी योगाचे मानवी जीवनातील महत्त्व पटवून दिले. क्रीडा शिक्षक रेवचंद भावेकर यांनी योग प्रशिक्षण दिले. याप्रसंगी अध्यापक विद्यालयातील वंदना बारई, श्रावण राठोड, जी. एस. तिजारे, अभय मकेश्वर, राजेश कापसे, पर्यवेक्षक रमेश निसडकर, राजहंस जंगले, प्रभाकर उईके, महेश मसराम, हेमंत माटे, मिलींद मून, खैरकार, बाळसराफ, रेखा गिंधेवार, प्रशांत तायडे, रवींद्र साटोडे, शोभा जाधव, पांडुरंग टेकाम, महादेव कोटनाके, संतोष राऊत, धनराज सोनवणे, राजु सोनवणे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन राजेश कापसे यांनी केले. आभार अभय मकेश्वर यांनी मानले.घोराड येथे योग दिन कार्यक्रमघोराड : येथील यमुना सभागृहात नागरिकांच्या सहकार्याने योग दिवस साजरा करण्यात आला. पहाटे ५ ते सकाळी ८ वाजेपर्यंत ग्रामस्थांना योगाचे धडे देण्यात आले. यावेळी विविध प्रकारची योगासने कारून दाखविण्यात आली. यावेळी पांडूरंग वरटका, राम इखार, सुरेश गुजरकर, रामा भुरे, देवराव तडस, सतीश तेलरांधे, संजय धोंगडे, राजेश वरटकर, आदींची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता गणेश खोपडे, मंगेश हांडे आदींनी सहकार्य केले. कृषक महाविद्यालयवर्धा : स्थानिक कृषक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक धोटे, तर अतिथी म्हणून ज्येष्ठ शिक्षक मरडवार उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शारीरिक शिक्षिका देशमुख यांनी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना योगाचे धडे दिले. मरडवार यांनी योग विषयावर सविस्तर माहिती दिली. धोटे यांनीही आंतरराष्ट्रीय योग दिनाचे महत्त्व व शासनाची भूमिका विशद केली. कार्यक्रमाचे संचालन मुडे यांनी केले. आभार वाणी यांनी मानले. रामकृष्ण बजाज महाविद्यालय वर्धा : रामकृष्ण बजाज कृषी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त योग अभ्यास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक गादेवार, प्राध्यापक, प्रा. डॉ. बाबा सोनटक्के व इतर कर्मचारी उपस्थित होते. प्रास्ताविकात प्रा. प्रमोद खोडके यांनी योगाचे प्रकार व महत्त्व सांगून काही प्राणायामाचे प्रात्यक्षिक करून दाखविले. योगाभ्यास आवश्यक असल्याचे माननीय, बौद्धिक, नैतिक, व्यक्तीमहत्व विषयक अशा मानवी जीवनाच्या विकास करण्यासाठी योग हे सर्वोत्तम साधन आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यालयवर्धा : स्थानिक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यालयात योग दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी मुख्याध्यापक बोबडे, उद्धव गाडेकर व विलास येंडे या शिक्षकांनी योगाचे धडे दिले. कार्यक्रमासाठी शरद वानखेडे, प्रदीप चोपडे, पुंडलिक नागतोडे, पुष्पा गभने, गजानन मडावी, अजय उमरकर, सुनील बांगडे, विनोद बोंबळे, विलास खोडके, संतोष साटोटे, मंदा कोपूलवार, सय्यद, इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. गभने यांनी उपस्थितांचे आभार मानले. यशवंत विद्यालय वायफड : येथील यशवंत विद्यालयात योगदिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक डी. झेड. काळे तर प्रमुख अतिथी म्हणून सरपंच आशा नाल्हे उपस्थित होते. यावेळी पिपरी (मेघे) येथील सातव्या सत्रातील विद्यार्थी अभिजीत काळे, शुभम वाढणकर, सौरभ सेलोकर, प्रतीक कलोसे, निखील निमजे, मुकेश राठोड प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी विविध आसनांचे प्रशिक्षण देण्यात आले. कार्यक्रमाला एच. बी. माळोदे, पी. आर. वडाळकर, आर. डब्ल्यु परिमल, एन. एच. किन्हेकर, एस.एम. भोयर, हिवंज,बोंडे उपस्थित होते.दिग्रस येथे योग दिवस साजरावर्धा : रामकृष्ण बजाज कृषी महाविद्यालयाच्या ग्रामीण कार्यानुभव सेवेच्या विद्यार्थ्यांनी दिग्रस येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला. यावेळी मुनेश्वर गजभिये, श्रीकांत बांते, नितेश शेंडे, नितीन रामटेके, राधे हातझाडे, गोविंदा राऊत यांनी योगचे महत्त्व विषद केले. कार्यक्रमाला मुख्याध्यापक नंदा मुळे, बी. जे. ठाकरे व विद्यार्थी उपस्थित होते. सरस्वती विद्या मंदिरवर्धा : सरस्वती विद्या मंदिर येथे योग दिवस साजरा करण्यात आला. संस्थेचे सचिव प्रकाश देशपांडे यांनी सर्वांचे स्वागत केले. प्रास्ताविक विजया व्यवहारे यांनी केले. यावेळी वर्षा भोयर, चंद्रशेखर महाजन, प्रकाश सावळीकर यांनी मार्गदर्शन केले. यशस्वीतेकरिता प्रकाश देशपांडे, कोषाध्यक्ष सिंधु अजंठीवाले, संचालक चंद्रशेखर दंढारे, मुख्याध्यापक मीना मेढुले, पुष्पलता देशमुख, वर्षा भोयर, विनोद जक्कनवार, सुखदा मशानकर, सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते.विद्या भारती कॉलेजसेलू : विद्याभारती कॉलेज व ज्यु. कॉलेज तसेच स्कूल आॅफ ब्रिलीयंट्सच्या संयुक्त विद्यमाने योग प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. भास्कर घैसास तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. खुशाल पठाडे, प्रा. वसीम खान, दीपाली वगळकर, कीर्ती गावंडे उपस्थित होते. किर्ती गावंडे यांनी योगाचे महत्त्व, योगाची आवश्यक्ता व योगा संबंधी घ्यावयाची काळजी याविषयी महिती दिली. डॉ. भास्कर घैसास यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. अभिजीत पाटील यांनी केले. आभार डॉ. करुणा गणवीर यांनी मानाले. यशस्वीतेकरिता प्रा. टिपले, प्रा. पिंपळे, प्रा. टापरे, प्रा. पाटील, प्रा. पंचभाई, प्रा. शास्त्रकार, डॉ. नागदिवे, डॉ. कावळे, डॉ. विभा निकोसे, मंगेश भोयर, देवेंद्र नाईक, आशिष कौरती, मनोज सूरजवंशी आदींनी सहकार्य केले.पतंजली योग समितीकारंजा(घा.) : येथील चरडे मंगल कार्यालयात पतंजली योगसमिती व सनशाईन स्कूलच्या संयुक्त विद्यमाने पहिला जागतिक योगदिन सार्वत्रिकरित्या साजरा करण्यात आला. पावसाला जुमानता जवळपास १५० महिला-पुरुष योग पे्रमीनी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली. यावेळी योग शिक्षक राजीव पालीवाल योग शिक्षिका भारती पालिवाल, संध्या उपाध्ये, विमला तिवारी गटशिक्षणाधिकारी उमेकर, प्रा. अरुण फाळके यांनी उपस्थितांना योगाबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला अ‍ॅड. पराडकर, जानराव लोखंडे आदी उपस्थित होते. नांदगाव माध्यमिक शाळानांदगाव : येथील माध्यमिक शाळेत आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात आला. योगवर्गाचे उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक एल. जी. सोनटक्के यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर योग प्रशिक्षक एस. डी. बुचे यांनी उपस्थित शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांना योग शिक्षणाचे धडे व योगासने समजावून सांगितली. कार्यक्रमाचे संचालन दिवाकर भालशंकर यांनी केले. आभार एस. एल. पाटील यांनी मानले. ग्रामपंचायत सभागृहआंजी (मोठी) : स्थानिक ग्रामपंचायत मैदानात आंतरराष्ट्रीय योगदिनाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु पाऊसा मुळे सदर कार्यक्रम सभागृहात घेण्यात आल्याने अनेक ग्रामस्थांना जागे अभावी सहभागी होता आले नाही. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून सरपंच जगदीश संचेरिया तर प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी कोटापे, वैद्यकीय अधिकारी झोटे, केंद्र प्रमुख भांडे उपस्थित होते. भांडे व खिराळे यांच्या मार्गदर्शनात योगासने करण्यात आली. ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्त ग्राम समिती सदस्य, पाणीपुरवठा ग्राम समिती सदस्य, जि. प. शाळेच्या शिक्षकवृर्ग, अंगणवाडी सेविका, आरोग्य केंद्राचे कर्मचारी व ग्रामस्थानी या कार्यक्रमात सहभाग घेतला. उपस्थितांचे आभार उपसरपंच नितीन भावरकर यांनी मानले. मोहता विद्यालयहिंगणघाट : प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी, क्रीडा भारती, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंगणघाट यांच्या संयुक्त विद्यमाने सिरेकुवरदेवी मोहता विद्यालयाच्या सभागृहात आयोजित पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष गो. गो. राठी, सचिव रमेश धारकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा सहसंचालक जेठानंद राजपूत उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक धारकर यांनी केले. यावेळी मधुकर बोरुटकर, विनोद कोसुरकर, राजू कारवटकर, शारदा कोसूरकर, आखाडे, धोंगडे यांनी योगासने करवून घेतली. कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष श्याम भीमनवार, सदस्य अग्रवाल, प्रमोद हंबर्डे, मुख्याध्यापक बळीराम चव्हाण, कल्पना मोरे, मधुकर बोरुटकर, संजय वंजारी, आखाडे, पिंपळखुटे, कुसे, उपमुख्याध्यापक नरहरी बुरीले, संभाजी घाटुर्ले, श्रद्धा घोडवैद्य आदी उपस्थित होते. संचालन निकीता कामडी तर आभार खेतल यांनी मानले. यशवंत हायस्कूलअल्लीपूर : स्थानिक यशवंत हायस्कूल येथे नेहरू युवा केंद्र वर्धा, जनजागृती युवा मंच अल्लीपूर आणि प्रभात फाउंडेशन संस्था यांचे संयुक्त विद्यमाने जागतिक योग दिनानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच मंदा पारसडे होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून धर्मलाल धुवारे, मंगेश दुबे, खंडारे, उपसरपंच रामु धनवीज, माजी सरपंच गजु नरड, प्राचार्य कुंटेवार, धनंजय कोमुजवार, कैलास बाळबुधे यासह ग्रामस्थ उपस्थित होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)