शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

यंदाही गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव अटळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 22:30 IST

जिल्ह्यात कापूस हे मुख्य पीक असून अनेक शेतकऱ्यांचे अर्थकारण कापसाच्या उत्पादनावरच अवलंबून आहे. गत वर्षी कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे कापसाच्या सरासरी उत्पन्नात घट झाली. यंदाही गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव अटळ असून सदर प्रादुर्भाव टाळण्यासाठी सामुहिक उपाययोजना करणे गरजेचे आहे.

ठळक मुद्देविद्या मानकर : सामूहिक उपाययोजना केल्यास अटकाव शक्य

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात कापूस हे मुख्य पीक असून अनेक शेतकऱ्यांचे अर्थकारण कापसाच्या उत्पादनावरच अवलंबून आहे. गत वर्षी कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे कापसाच्या सरासरी उत्पन्नात घट झाली. यंदाही गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव अटळ असून सदर प्रादुर्भाव टाळण्यासाठी सामुहिक उपाययोजना करणे गरजेचे आहे. सामुहिक उपाययोजनाच गुलाबी बोंडअळीला अटकाव घालू शकतात, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विद्या मानकर यांनी दिली.मानकर पुढे म्हणाल्या, गत वर्षीच्या गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे कपाशी उत्पादक शेतकरी मेळाकुटीस आला होता. कापूस उत्पादकांना त्यावेळी मोठा आर्थिक फटकाच सहन करावा लागला. यंदाच्या वर्षी जिल्ह्यात सुमारे २ लाख २६ हजार ३६३ हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वेळीच उपाय करणे गरजेचे आहे. एकट्या कृषी विभागाच्या प्रयत्नाने गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावाला अटकाव करता येणार नाही. त्यासाठी प्रत्येक कपाशी उत्पादक शेतकऱ्याने पुढे येत कृषी तज्ज्ञांकडून सुचविलेल्या योग्य उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.गत दोन महिन्यांपासून गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावाला अटकाव करण्यासाठी व शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून चित्र रथ व ठिकठिकाणी कार्यशाळा घेवून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. फरदड कापूस घेऊ नये, पूर्व हंगामी लागवड करू नये, योग्य वाणाची निवड करावी, पिकांची फेरपालट करावी, दोनपेक्षा अधिक कीटकनाशके मिसळून फवारणी करू आदी विषयांवर या कार्यशाळेत तज्ज्ञांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आहे. शिवाय सध्याही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. सोमवार १६ जुलैपासून विशेष कार्यशाळा घेण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी कुठलीही अडचण असल्यास तात्काळ तालुका कृषी कार्यालयातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा, असे आवाहनही यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विद्या मानकर यांनी केले.सोमवारपासून गावपातळीवर शिबिरगुलाबी बोेंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी तसेच कपाशी उत्पादकांना योग्य मार्गदर्शन देण्यासाठी जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये गाव पातळीवर विशेष कार्यशाळा व शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. कुठल्याही शेतकऱ्याला अडचण आल्यास त्याने तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. शेतकऱ्याना योग्य मार्गदर्शन करण्यात येईल, असेही यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विद्या मानकर यांनी केले.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी