शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

यंदा वाळूघाटाला लागली विक्रमी बोली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 23:26 IST

वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर मागील महिन्यात जिल्ह्यातील आठ घाटांचा लिलाव करण्यात आला. या आठ घाटांपैकी सर्वाधिक बोली आष्टी तालुक्यातील धोची या घाटाची लागली असून हा वाळू घाट २ कोटी ३५ लाख ५० हजार रुपयात आरपीपी इंफ्रा.प्रोजेक्टस लिमिटेडने घेतला आहे.

ठळक मुद्देधोचीघाट गेला २ कोटी ३५ लाखांत : पहिल्या टप्प्यात आठ घाटांचा लिलाव

आनंद इंगोले ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर मागील महिन्यात जिल्ह्यातील आठ घाटांचा लिलाव करण्यात आला. या आठ घाटांपैकी सर्वाधिक बोली आष्टी तालुक्यातील धोची या घाटाची लागली असून हा वाळू घाट २ कोटी ३५ लाख ५० हजार रुपयात आरपीपी इंफ्रा.प्रोजेक्टस लिमिटेडने घेतला आहे. आतापर्यंतची वाळू घाटाची ही सर्वाधिक बोली असल्याचे सांगण्यात आले आहे. यापूर्वी आर्वी तालुक्यातील पिंपळगाव येथील वाळू घाटाला २ कोटी ३ लाख रुपयाची बोली लागली होती. आता या सर्वोच्च बोली लागलेल्या घाटातून खरच नियमानुसार वाळू उपसा होणार काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.मागील वर्षी वाळघाटांचा लिलाव न झाल्याने वाळू चोरीचे प्रमाण वाढले होते. गावातील नदी-नाले उपसून दामदुप्पट वाळूची विक्री सुरु केली होती. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने पहिल्या टप्प्यात आठ घाटांवा लिलाव करण्यात आला. यामध्ये आष्टी तालुक्यातील इस्माईलपूर व नवाबपूर, हिंगणघाट तालुक्यातील सोनेगाव (रिठ), नांदगाव (बो.)-२, पारडी (नगाजी), बिड (लाडकी) व धोची तर समुद्रपूर तालुक्यातील शिवणी-१, शिवणी-२ व मांडगाव अशा दहा घाटांच्या लिलावकरिता कार्यक्रम जाहीर केला होता.यापैकी नवाबपूर व बिड (लाडकी) हे दोन घाट वगळता इतर आठ घाटांचा लिलाव करण्यात आला. या लिलाव झालेल्या घाटाची किंमत ४ कोटी ३३ लाख ३ हजार ६५० रुपये असून घाटधारकांनी ६ कोटी ७४ लाख ४१ हजार ८५० रुपयाची सर्वोच्च बोली लावली. आता यावर्षी खनिकर्म विभागात हा मोठा महसूल जमा होणार आहे. घाटधारकांनी तहसील कार्यालयाकडून ताबा घेण्यापूर्वीच उपसा सुरु केल्याने या घाटातून नियमबाह्य उपसा सुरु असल्याचीच सर्वत्र बोंब आहे.घाट एकाच्या नावे, चालवितात दुसरेचजिल्हातील ज्या घाटाचे लिलाव झाले व ज्या घाटाचे अद्यापही लिलाव झाले नाही. त्या सर्व घाटातून अवैध रेती उपसा सुरु आहे. लिलाव झालेले घाट एकाचे नावे असताना दुसरेच वाळूची उचल करतांना दिसून येत आहे. तसेच एकाच घाटात अनेक पार्टनर असून त्या पार्टनरचेही सब पार्टनर एकाच घाटातून उचल करत आहे. एकाच रॉयल्टीवर अनेक वाहने धावत असून मशीनसह बोटींचाही सर्रास वापर होत आहे. अशात इतरांच्या उपद्रवामुळे कारवाई झाल्यास घाटधारकच गोत्यात येण्याची शक्यता आहे. पण, कारवाई होणार का? हाही प्रश्नच आहे.खनिकर्म विभागाने गाठला उच्चांकशासनाकडून दरवर्षी प्रत्येक विभागाला महसुलाचे उद्दिष्ट दिले जाते. गेल्यावर्षी जिल्हा खनिकर्म विभागाला ४७ कोटीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. या कार्यालयाने मुरुम, दगड, रेती, माती व गिट्टी आदींमधून तब्बल ५६ कोटीचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा केला आहे. यापूर्वीही खनिकर्म विभागाने आपले उद्दिष्ट पार करुन मोठा महसूल शासनाला दिला. यावर्षी तर उद्दिष्टाने १२२ टक्क्यापर्यंत उच्चांक गाठला आहे.

इतर वर्षीच्या तुलनेत यावर्षी वाळूघाटाला सर्वोच्च बोली लागली आहे. तसेच जिल्हा खनिकर्म विभागाकडून १२२ टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. या उद्दिष्टपूर्तीत महामार्गाच्या कामांचा तसेच खदाणीच्या इटीएस मेजरमेटचा मोठा वाटा आहे. सोबतच आठ घाटाच्या लिलावातून महसूलात भर पडली आहे.- डॉ.इम्रान शेख, जिल्हा खनिकर्म अधिकारी.

टॅग्स :sandवाळू