शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

यशवंतनगरात धाडसी घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 23:58 IST

येथील यशवंतनगरातील प्रल्हाद लालचंद दूबानी यांच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरातून रोख २० हजार रुपयांसह सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण ७ लाख २० हजार २०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये चोरट्याची दहशत निर्माण झाली असून घटनेची नोंद हिंगणघाट पोलिसांनी घेतली आहे.

ठळक मुद्देपरिसरात चोरट्यांची दहशत : ७.२० लाखांचा मुद्देमाल पळविला

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : येथील यशवंतनगरातील प्रल्हाद लालचंद दूबानी यांच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरातून रोख २० हजार रुपयांसह सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण ७ लाख २० हजार २०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये चोरट्याची दहशत निर्माण झाली असून घटनेची नोंद हिंगणघाट पोलिसांनी घेतली आहे. सदर घटना मंगळवारी रात्री घडली.प्राप्त माहितीनुसार, प्रल्हाद दूबानी व त्यांचे कुटुंबीय हे यांच्या आईचे निधन झाल्याने त्यांच्या भावाच्या सिंधी कॉलोनीतील घरी गेले होते. तेथे पुजा सुरू होती. सुमारे ९ वाजताच्या सुमारास ते घरी परतले असता त्यांना समोरच्या दाराला कुलुप नसून आतून दार बंद असल्याचे दिसून आले. शिवाय घराचे मागील दार उघडे असल्याचेही त्यांच्या निदर्शनास आले. बारकाईने पाहणी केली असता आलमारी उघडली. शिवाय त्यातील २० हजारांच्या रोखसह सोन्याच्या आठ बांगड्या, आठ अंगठ्या, सोनसाखळी, लॉकेट तसेच चांदीचे दागिने चोरट्याने चोरून नेल्याचे दिसून आले. तर चोरट्याने याच आलमारीतील चोर कप्प्यातील काही सोन्याचे दागिने नेले नसल्याचे दिसले. त्यानंतर प्रल्हाद दूबानी यांनी घटनेची माहिती हिंगणघाट पोलिसांना दिली.चोरी झाल्याची माहिती मिळताच हिंगणघाट पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अभिषेक बागडे यांनी आपल्या चमूसह घटनास्थळ गाठून बारकाईने पाहणी केली. घटनास्थळी श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. या घटनेची नोंद हिंगणघाट पोलिसांनी घेतली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अश्विनी वाकडे करीत आहे.

टॅग्स :Thiefचोर