शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

यशोदा, भदाडी झाली सैराट; शेतीपिकांची लावलीय वाट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2022 05:00 IST

जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आलेल्या पावसाने शेतकरी सुखावला होता. परंतु, ९ जुलैला परिसरात ढग फुटीसदृश पाऊस झाल्याने यशोदा व भदाडी नदी चांगलीच फुगली. या नदीतील पाणी सोनेगाव (आबाजी) पढेगाव, चिकणी, जामनी, निमगाव, दहेगाव, वायफड, केळपूर, डिगडोह, नांदोरा (डफरे) आदी गावांत शिरल्याने शेकडो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. नदीकाठच्या शेतातील पिके पूर्णत: खरडून गेलीत. यामुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामणी) : पावसाच्या प्रतीक्षेत जूनच्या दुसऱ्या आठवड्यात चिकणीसह परिसरात शेतकऱ्यांनी कपाशी, तूर, सोयाबीनची लागवड केली. पण, पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणीच्या संकटाला सामोरे जावे लागले. शेतकऱ्यांनी पुन्हा कर्जबाजारी होऊन पेरणी केली. पिके  अंकुरायला लागताच मुसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसाने चांगलेच झोडपून काढल्याने परिसरातून वाहणारी यशोदा आणि भदाडी नदीही सैराट झाली आणि शेतशिवारातील पिके खरडून नेली. त्यामुळे आता तिबार पेरणीचे संकट ओढवले आहे.जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आलेल्या पावसाने शेतकरी सुखावला होता. परंतु, ९ जुलैला परिसरात ढग फुटीसदृश पाऊस झाल्याने यशोदा व भदाडी नदी चांगलीच फुगली. या नदीतील पाणी सोनेगाव (आबाजी) पढेगाव, चिकणी, जामनी, निमगाव, दहेगाव, वायफड, केळपूर, डिगडोह, नांदोरा (डफरे) आदी गावांत शिरल्याने शेकडो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. नदीकाठच्या शेतातील पिके पूर्णत: खरडून गेलीत. यामुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. यासाठी शासनाने तातडीने पंचनामे करून हेक्टरी २५ हजारांची नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

राज्यात ना कृषिमंत्री,  जिल्ह्यात ना पालकमंत्री- अलीकडेच राज्यात राजकीय भूकंप झाल्याने महाविकास आघाडी सरकार कोसळले. राज्याला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तर मिळाले. पण, मंत्र्यांचे खाते वाटप झाले नसल्याने या आपत्ती काळात राज्यात ना कृषिमंत्री आहे ना  जिल्ह्याला पालकमंत्री, त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली व्यथा कुणाकडे मांडावी. शेतकऱ्यांचा प्रश्न कोण तडीस लावणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

सुरुवातीला पावसाअभावी तर आता पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. पावसाअभावी दुबार पेरणी करावी लागली. आता अतिवृष्टीने सर्व पिके खरडून गेल्याने तिबार पेरणीचे सावट आहे. या आपत्ती काळात राज्याला कृषिमंत्री नाही आणि जिल्ह्याला पालकमंत्री नाही, त्यामुळे कोणाकडे मागणी करावी, हा प्रश्न आहे. शासनाने तातडीने हेक्टरी २५ हजारांची मदत करुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.- सतीश दाणी, राज्याध्यक्ष शेतकरी संघटना युवा आघाडी.

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतीसह अनेकांच्या घरांचे नुकसान झाले आहे. याचा आढावा घेण्याकरिता जिल्ह्याला पालकमंत्रीही नाही. शेतकऱ्यांची अडचण कोण सोडविणार, हा प्रश्न आहे. शेतकऱ्याला नेहमीच अस्मानी-सुलतानी संकटांचा सामना करावा लागतो. त्यामुळे जिल्हाधिकारी व तहसीलदार यांनी तातडीने शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजारांची नुकसानभरपाई जाहीर करुन दिलासा द्यावा. - संजय वानखेडे,शेतकरी,जामणी. 

 

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती