शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

यश खासबागे जिल्ह्यातून प्रथम

By admin | Updated: May 31, 2017 00:39 IST

विद्यार्थ्यांकरिता शैक्षणिक दृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या राज्य बोर्डाच्या उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल

१८ हजार ४६८ विद्यार्थ्यांनी दिली बारावीची परीक्षा लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : विद्यार्थ्यांकरिता शैक्षणिक दृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या राज्य बोर्डाच्या उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल मंगळवारी दुपारी जाहीर झाला. परीक्षेत जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान यशवंत महाविद्यालय वर्धाच्या यश चंद्रशेखर खासबागे याने पटकाविला. त्याने ९४.९२ टक्के गुण घेतले. तर द्वितीय स्थानी दोन विद्यार्थिनी राहिल्या. यात गो.से. वाणिज्य महाविद्यालयाची निकीता द्वारकाप्रसाद पांडे व यशवंत महाविद्यालयाची साक्षी राजेंद्र कुळकर्णी यांचा समावेश आहे. या दोघींनीही ६१३ गुण घेतले. त्यांची टक्केवारी ९४.३० एवढी आहे. तृतीय स्थानही गो.से. वाणिज्य महाविद्यालयाची वृशाली विजय मसने व हिंगणघाट येथील जी.बी.एम.एम. महाविद्यालयाचा सौरभ काशिनाथ आंभोरकर या दोघांनी संयुक्तरित्या राखले. त्यांनी ६१२ गुण घेतले. त्यांची टक्केवारी ९४.१५ एवढी आहे. यंदाच्या शैक्षणिक सत्रात वर्धा जिल्ह्यातील आठही तालुक्यातील १३४ महाविद्यालयातून १८ हजार ४६८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यात ९ हजार २४५ मुले तर २ हजार ९१३ मुलींचा समावेश होता. यापैकी १५ हजार ७४४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात ७ हजार ४४९ मुले तर ८ हजार २९८ मुलींचा समावेश आहे. या निकालातही दिल्ली बोर्डाच्या निकालाप्रमाणे मुलींनीच आघाडी घेतल्याचे दिसून आले. जाहीर झालेल्या निकालात ८६६ विद्यार्थी प्राविण्यासह उत्तीर्ण झाले. ४ हजार ३६५ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ९ हजार ३४४ द्वितीय श्रेणीत, १ हजार १७२ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले सहा महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के जिल्ह्यात उच्च माध्यमिक अभ्यासक्रमाची १३४ विद्यालये आहेत. त्यापैकी फक्त सहा महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. यात म्हसाळा येथील जिजामाता सबाने विद्यालय, सेवाग्राम मार्गावरील सुशील हिंमतसिंगका विद्यालय, पुलगाव येथील लेबर कॅम्प सायन्स अ‍ॅण्ड कॉमर्स विद्यालय, पुलगाव येथील सेंट जॉन, होली फेथ ज्युनिअर कॉलेज व सेलू येथील दिपचंद चौधरी कनिष्ठ विज्ञान विद्यालयाचा समावेश आहे. पुनर्परीक्षार्थ्यांचा निकाल ३३.३६ टक्के जिल्ह्यातून १ हजार २७२ विद्यार्थ्यांनी पुनरपरीक्षार्थी म्हणून नामांकन दाखल केले होते. त्यापैकी १ हजार २६५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ४२२ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. त्यांची टक्केवारी ३३.३६ टक्के आहे. विज्ञान शाखेत १५१ विद्यार्थ्यांपैकी १२८, कला शाखेत ८२७ विद्यार्थ्यांपैकी २३६, वाणिज्य शाखेत ९८ विद्यार्थ्यांपैकी ३४ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. व्यावसायिक अभ्यासक्रमात ८९ पैकी २४ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत.