शहरं
Join us  
Trending Stories
1
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
2
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
3
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
4
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
5
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
6
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
7
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
8
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
9
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
10
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
11
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
12
"हे खूपच धक्कादायक..."; मॉर्फ केलेले फोटो, खोट्या बातम्या पाहून प्रिती झिंटा भडकली, म्हणाली...
13
Online Gaming Addiction: ऑनलाईन गेमचा नादच लय वाईट...; कर्जात बुडालेल्या तरुणानं उचललं टोकाचं पाऊल
14
Maharashtra Rain: साताऱ्यात पुन्हा वळीव बरसला; यवतेश्वर घाटात टॉवर कोसळला! 
15
'ढोंगी आणि बकवास लेकाचे'; छगन भुजबळ मंत्री होताच संजय राऊतांनी कोणावर डागली तोफ?
16
Ulhasnagar: आता उल्हासनगरात गुन्हेगारांवर 'अशी' ठेवली जाणार नजर!
17
दिग्वेश राठीनं शायनिंग मारण्याच्या नादात IPL पगारातील किती रक्कम उडवली माहितीये?
18
केंद्र सरकारच्या शिष्टमंडळात सामील होण्यास उद्धव ठाकरेंचा होकार, खा. प्रियंका चतुर्वेदींची निवड
19
IPL 2025: SRHचा हर्षल पटेल ठरला मलिंगा-बुमराहपेक्षाही 'वेगवान'; केला ऐतिहासिक पराक्रम
20
'आम्हाला चिनी क्षेपणास्त्र PL-15E चे अवशेष हवेत'; जपान अन् फ्रान्ससह अनेक देशांची मागणी

वर्धेचा संतोष वाघ ठरला ‘चॅम्पियन आॅफ चॅम्पियन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 22:14 IST

येथील श्री हेल्थ व विदर्भ बॉडी बिल्डर्स अ‍ॅण्ड फिटनेस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. मेहेर झेंडे यांच्या स्मृत्यर्थ ‘जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव मेहेर श्री २०१८’ स्पर्धेचे आयोजन केले होते.

ठळक मुद्देजिल्हास्तरीय शरीर सौष्ठव मेहर श्री २०१८ स्पर्धा : ८२ स्पर्धकांनी नोंदविला सहभाग

आॅनलाईन लोकमतआर्वी : येथील श्री हेल्थ व विदर्भ बॉडी बिल्डर्स अ‍ॅण्ड फिटनेस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. मेहेर झेंडे यांच्या स्मृत्यर्थ ‘जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव मेहेर श्री २०१८’ स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत ‘चॅम्पियन आॅफ चॅम्पियन’ हा पुरस्कार वर्धेच्या संतोष वाघ यांनी पटकाविला.भारतरत्न राजीव गांधी स्टेडीयमवर घेण्यात आलेल्या स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार दादाराव केचे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी पोलीस निरीक्षक अशोक चौधरी तर अतिथी म्हणून विदर्भ बॉडी बिल्डींग चॅम्पीयन किशन तिवारी, नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाखे, डॉ. श्यामसुंदर भुतडा, प्रा. अभय दर्भे, डॉ. रिपल राणे, बाळासाहेब नांदुरकर, सचिन होले, संजय भेंडे, राहुल गोडबोले, दशरथ जाधव, गौरव जाजू, अन्सार भाई, महफुज कुरेशी, परवेज साबीर, सतीश शिरभाते आदी उपस्थित होते.केचे यांनी मार्गदर्शन करताना तरूणांनी मोबाईल, व्हॉटस् अ‍ॅपच्या मागे न लागता शरीर सौष्ठव कमविण्याकरिता व्यायामाकडे लक्ष दिले पाहिजे. सुदृढ आरोग्याचे तरूण हे राष्ट्राची संपत्ती ठरते, असे सांगितले.वयोगटाप्रमाणे सहा भागात विभागून घेण्यात आलेल्या या स्पर्धेत ८२ स्पर्धक सहभागी झाले होते. यातील ५५ किलो वजनगटातील राहुल धामणकर, शेख शौकत, अमर ठाकरे, मंगेश मेश्राम, अनिल ढेकले यांनी, ६० किलो वजनगटातील ज्ञानेश्वर मडावी, रितेश दरवणे, धनराज गोहर, रितेश डिके, बादल धावरे यांनी, ६५ किलो वजनगटातील स्वप्नील कुरवाडे, पंकज ढाकुलकर, सुधाकर काळसर्पे, राहुल वैद्य, करण समुद्रे यांनी, ७० किलो वजनगटातील नितीन चव्हाण, अमित आगरे, सिद्धार्थ लुले, निरंजन संगीतवार, प्रवीण लांजेवार यांनी, ७५ किलो वजनगटातील राज डुलगज, अनिल पराते, प्रमोद आमटे, अनुराग वसु, योगेश चंडाले यांनी उत्कृष्ट सादरीकरण केले. त्यांना पुरस्कार व स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.शिवाय चॅम्पीयन आॅफ चॅम्पियन्सचा प्रथम पुरस्कार वर्धेच्या संतोष वाघ यांनी पटकाविला. बेस्ट मसल मॅनचा पुरस्कार स्वप्नील कुरवाडे यांनी पटकाविला तर बेस्ट पोजरचा पुरस्कार राज डुलगज यांनी प्राप्त केला.परिक्षणाचे कार्य विदर्भ बॉडी बिल्डर्स अ‍ॅण्ड फिटनेस असो. च्या डॉ. राजू कोतेवार, दिनेश चवरे, स्वप्नील वाघुले, किशोर आदमने यांनी पार पाडले. संचालन क्रीडा प्रशिक्षक कपील ठाकूर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. श्रीकांत ठाकूर यांनी केले. संचालन नितीन बोडखे यांनी केले तर आभार पंकज कदम यांनी मानले. स्पर्धेचे आयोजन विजय जयस्वाल (झेंडे), डॉ. योगेश देवतळे, डॉ. श्रीकांत ठाकूर यांनी केले होते. अफरोज खान, श्रीकांत निनावे, अनूप जैसिंगपुरे, कल्लू कुरेशी, योगेश चंडाले, स्वप्नील कुरवाडे, रूखसार कुरेशी, बिलाल कुरेशी, शक्ती पवार आदींनी सहकार्य केले.