शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

वर्धेकरांचा शिवरायांना मानाचा मुजरा

By admin | Updated: March 16, 2017 00:37 IST

जय शिवाजी..जय भवानी.. च्या जयघोषात वर्धेकरांनी शिवरायांना मानाचा मुजरा केला. बुधवारी छत्रपतींची जयंती तिथीनुसार साजरी करण्यात आली.

छत्रपतींचा जयजयकार : मिरवणुकांसह कार्यक्रम वर्धा : जय शिवाजी..जय भवानी.. च्या जयघोषात वर्धेकरांनी शिवरायांना मानाचा मुजरा केला. बुधवारी छत्रपतींची जयंती तिथीनुसार साजरी करण्यात आली. शिवाराय जयंतीनिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रम घेण्यात आले. शहरातील विविध भागात शिवभक्तांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हारार्पण करीत अभिवादन केले. शिवजयंतीनिमित्त शिवसेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने मुख्य मार्गावर रोषणाई करण्यात आली. शिवसेना शहर शाखेद्वारे भगव्या पताका लावून मुख्य मार्गावर सजावट करण्यात आली. बजाज चौकात मनसेद्वारे कार्यक्रम घेण्यात आला. कृष्णनगर येथील संत गाडगेबाबा मठ प्रांगणात ‘छत्रपती शिवाजी महाराज यांचे मॅनेजमेंट कौशल्य’ विषयावर प्रा. सूमन टेकाडे यांचे व्याख्यान झाले. ढोलताशा पथकाने सलामी दिली. जिल्ह्यात ठिकठिकाणी शोभायात्रा काढून अभिवादन केले.(कार्यालय प्रतिनिधी) सायंकाळी शहरात शिवसेनेद्वारे शोभायात्रा काढण्यात आली. यात विविध झाक्यांचा समावेश होता. समोर भगवी पतका घेतलेला अश्व, बँड पथक व शिवभक्तांची गर्दी. या गर्दीत शिवराय, माँ साहेब जिजाऊ व मावळ्यांची वेषभूषा केलेले युवक आकर्षण ठरले. शोभायात्रा शास्त्री चौकातून निघून मुख्य मार्गाने शिवाजी महाराज चौकात विसर्जित झाली. मनसेद्वारेही शोभायात्रा काढण्यात आली. रोषणाई व सजावट आकर्षण ठरली.