शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा रेल्वेस्थानक होणार जागतिक दर्जाचे प्रवासी केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 14:24 IST

भारत सरकारच्या माध्यमातून व रेल्वे मंत्रालयाच्या वतीने महाराष्ट्र राज्यातून एकूण सहा रेल्वेस्थानकाचा पुर्नविकास करुन तेथे जागतिक दर्जाचे प्रवासी केंद्र उभारण्याकरिता मंजुरी दिली आहे.

ठळक मुद्देकेंद्राची मंजुरीमहाराष्ट्रातून सहा रेल्वेस्थानकांची निवड

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : भारत सरकारच्या माध्यमातून व रेल्वे मंत्रालयाच्या वतीने महाराष्ट्र राज्यातून एकूण सहा रेल्वेस्थानकाचा पुर्नविकास करुन तेथे जागतिक दर्जाचे प्रवासी केंद्र उभारण्याकरिता मंजुरी दिली आहे. या सहा रेल्वेस्थानकांच्या यादीत वर्धा रेल्वेस्थानकाचा समावेश असल्याची माहिती वर्धा लोकसभा मतदार संघाचे खासदार रामदास तडस यांनी दिली.केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्या अधिकृत शासकीय ट्विटर अकाऊंटच्या माध्यमातून याबाबत माहिती देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यातील शिवाजी नगर (पुणे), लोणावळा, इगतपूरी, सोलापूर, पुणे व वर्धा या रेल्वेस्थानकांची पुर्नविकास प्रकल्पाकरिता निवड करण्यात आली आहे. वर्धा रेल्वे स्थानकाचा विकास म्हणजे अनेक नवीन संधी उपलब्ध होणार आहे. पायाभुत सुविधा उपलब्ध करून दिल्याने भविष्यात अनेक लांब पल्ल्यांच्या प्रवासी रेल्वे गाड्या येथे थांबू शकतात. तसेच वर्धा रेल्वे स्थानकावरुन अनेक प्रवासी रेल्वे गाड्या प्रारंभ होण्याकरिता निश्चितच मदत होईल. वर्धा रेल्वेस्थानकाचा पुर्नविकास तसेच जागतिक दर्जाचे प्रवासी केंद्र निर्माण करताना तंत्रज्ञान, स्थानिक संस्कृती व ऐतिहासिक महत्त्व या प्रमुख तत्वांवर वर्धा रेल्वेस्थानकाची निर्मिती प्रस्तावित आहे. वर्धा रेल्वेस्थानकाच्या या विकास कार्याकरिता कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून झोनल रेल्वे (मध्य रेल्वे) यांना अधिकृत करण्यात आल्याची माहिती यावेळी खासदार तडस यांनी दिली. वर्धा रेल्वेस्थानकाची पुर्नविकास प्रकल्पाकरिता निवड झाल्याची बातमी कळल्यानंतर खासदार तडस यांनी रेल्वेमंत्री पियूष गोयल यांची रेलभवन, दिल्ली येथे भेट घेऊन आभार व्यक्त केले.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे