शहरं
Join us  
Trending Stories
1
One Big Beautiful Bill Passed : डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा विजय, अमेरिकेच्या संसदेत 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; नेमकं काय आहे यात?
2
‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ विजेत्या गावांना प्रत्येकी २५ लाख; ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची घोषणा
3
पुणे हादरले : घरात घुसून तरुणीवर बलात्कार, तिच्याच मोबाइलवर काढले फोटो ; संगणक अभियंता तरुणी राहात होती उच्चभ्रू सोसायटीत
4
दलाई लामांना ड्रॅगन-विळखा
5
यूपीतील शेतकऱ्यांच्या नावे नांदेडमध्ये पीक विमा; ४० सुविधा केंद्र चालकांवर गुन्हा; त्यात ९ जण परळीचे
6
कार चालकाची चूक असल्यास भरपाई मिळणार नाही; सर्वोच्च न्यायालयाने दिले निर्देश
7
लंडनची डॉक्टर मैत्रीण पोलिसांच्या रडारवर; दादरमधील अत्याचार प्रकरणातील शिक्षिकेच्या वैद्यकीय चाचण्या पूर्ण; १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
8
बनावट लेटरहेडद्वारे आमदार निधी लाटल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल; आ. प्रसाद लाड यांच्या तक्रारीवरून तपास सुरू
9
टेस्टमध्ये फुटबॉलचं ट्विस्ट! हॅरी ब्रूकनं खांद्यानं उडवला स्टंपवरचा चेंडू; आधी पंतनं केली टाइमपास करतोय अशी तक्रार, मग...
10
"भारताने पाकिस्तानी एअरबेसवर 11 क्षेपणास्त्रे डागली, अल्लाहतालाने..."; इस्लामिक स्कॉलर्ससमोर पाकिस्तानचं रडगाणं!
11
ENG vs IND : भेदक मारा अन् 'स्लिप'मध्ये जागता पहारा! टीम इंडियानं उडवली यजमान इंग्लंडची झोप
12
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
13
शुबमन गिलनं उद्ध्वस्त केला ४६ वर्षांपूर्वीचा 'महा रेकॉर्ड'; गावसकर, सचिन, द्रविड अन् शास्त्रींना मागे टाकत बनला 'NO.1'
14
ENG vs IND : बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपचा "मैं हूँ ना...शो"! दोन्ही शतकवीरांच्या पदरी भोपळा
15
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
16
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
17
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
18
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
19
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
20
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल

सौर ऊर्जा व मोजमाप यंत्रणेवर कार्यशाळा

By admin | Updated: June 25, 2014 00:38 IST

महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकरण संस्थेमध्ये भारत सरकारच्या जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय सौर उर्जा मिशन अंतर्गत पवन ऊर्जा तंत्रज्ञान केंद्र चैन्नई यांच्यावतीने ‘सौर ऊर्जा मोजमाप यंत्रणा’ ची स्थापना

वर्धा : महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकरण संस्थेमध्ये भारत सरकारच्या जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय सौर उर्जा मिशन अंतर्गत पवन ऊर्जा तंत्रज्ञान केंद्र चैन्नई यांच्यावतीने ‘सौर ऊर्जा मोजमाप यंत्रणा’ ची स्थापना व उद्घाटन कार्यक्रम पार पडला. यावेळी एमगिरीचे संचालक डॉ. पी. बि. काळे अध्यक्षस्थानी होते. उद्घाटक म्हणून खासदार रामदास तडस होते. सौर ऊर्जा मोजमाप यंत्रणाच्या व्यवस्थापन व कार्यसंचालन विषयावर दोन दिवसीय कार्यशाळा व प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. याकरिता वेगवेगळ्या राज्यातून अधिकारी सहभागी झाले होते. याप्रसंगी बोलताना तडस म्हणाले, सौर ऊर्जा हा अखंड स्वरुपात उपलब्ध असणारा ऊर्जा स्त्रोत आहे. या ऊर्जेचा वापर करुन वीज निर्मिती करणे शक्य आहे. सदर वीज निर्मिती प्रकल्प स्थळावर प्राप्त होणाऱ्या सौर किरणावर अवंलबून असते. या सौर किरणाचा अभ्यास शास्त्रोक्त पद्धतीने केल्यास एका ठिकाणी किती प्रमाणात सौर ऊर्जेपासून वीजनिर्मिती करता येऊ शकेल याची माहिती उपलब्ध होते. यासाठी राज्यातील निरनिराळ्या भौगोलिक क्षेत्रामध्ये सौर प्रारणाचा अभ्यास करुन योग्य सौर ऊर्जा प्रकल्प क्षेत्राची निवड करणे शक्य होण्यासाठी एमगिरी मध्ये सौर प्रारण मापन केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. तसेच या यंत्रणेच्या स्थापनेमुळे वातावरणा संबंधित माहिती मिळणार ज्याचा शेतकरी वर्गाला मोठा फायदा होणार असल्याची माहिती दिली.यानंतर बोलताना काळे यांनी म्हणाले, या यंत्रणेच्या स्थापनेमुळे सौर ऊर्जे संबंधित अधिकाधिक माहिती मिळणार आहे. महाराष्ट्रामध्ये आजवर या प्रकारचे १३ केंद्र स्थापित केले आहे. त्यापैकी एमगिरी हे एक आहे. याकरिता मंत्रालयाचे प्रतिनिधी डॉ. गिरीधरयांनी सहकार्य केले. या यंत्रणे सारख्याच आणखी वेगवेगळ्या यंत्रणा एमगिरीला मिळवून दिल्यास ग्रामीण लोकांना जास्तीत जास्त माहिती व सुविधा प्राप्त होऊ शकेल, असे सांगितले. या कार्यशाळेला मंत्रालयाचे प्रतिनिधी डॉ. गिरीधर, डॉ. विभा गुप्ता, डॉ. करुणाकरण, प्रकाश पोहरे तसेच एमगिरी संस्थाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन जयकिशोर छंगाणी यांनी केले. कार्यशाळेत सहभागी प्रशिक्षणार्थी यांना तासंबंधी माहिती देऊन तंत्रज्ञान समजावून सांगण्यात आले.(स्थानिक प्रतिनिधी)