शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
4
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
5
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
6
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
7
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
8
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
9
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
10
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
11
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
12
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
13
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
14
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
15
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
16
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
17
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
18
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
19
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
20
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे

वरिष्ठ नागरिकांचे अधिकार विषयावर कार्यशाळा

By admin | Updated: October 7, 2016 02:22 IST

प्रियदर्शिनी महिला महाविद्यालयात अंतर्गत गुणवत्ता शाश्वती कक्ष (आयक्यूएसी), रासेयो व जिल्हा विधी

वर्धा : प्रियदर्शिनी महिला महाविद्यालयात अंतर्गत गुणवत्ता शाश्वती कक्ष (आयक्यूएसी), रासेयो व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ‘वरिष्ठ नागरिकांचे अधिकार’ या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली. वरिष्ठ नागरिकांचे अधिकार, कर्तव्ये व त्यांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून मिळणारे ‘कायदेविषयक सहाय्य’ या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. रंभा सोनाये तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा न्यायाधीश खोंगल उपस्थित होते. कार्यशाळेला जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सदस्य सचिव, सु. ना. राजूरकर , दिवाणी न्यायाधीश धनंजय काळे आणि अ‍ॅड. बी.डी. लांबट यांनी मार्गदर्शन केले. पूर्वी घरात हवे नको ते बघण्याची मुलांची धडपड असायची. पण आज परिस्थिती बदलली आहे. त्यांना वृद्ध व्यक्ती घरात असणे अडचणीचे वाटते. वरिष्ठ नागरिकांना आर्थिक सहाय मिळावे व त्यांचे पालनपोषण नीट व्हावे याबाबत फौजदारी प्रक्रिया संहीतेमध्ये तरतूद केलेली आहे. वरिष्ठ नागरिकांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. त्याचा विचार करून सन २००७ मध्ये आई-वडील व वरिष्ठ नागरिकांचे कल्याण व पालणपोषण अधिनियम २००७ अंमलात आले. या कायद्यातील तरतुदीवर सविस्तर चर्चा यावेळी करण्यात आली. मंचावर न्यायधीश ठाणेकर, कुलकर्णी, बेलसरे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका डॉ. धनंजय सोनटक्के यांनी मांडली. आभार डॉ. सुधाकर सोनोने यांनी मानले. यशस्वीतेसाठी डॉ. प्रियराज महेशकर, प्रा. दीपक महाजन, प्रा. अमोल घुमडे, देविदास चवरे, वेदनाथ चौधरी, विनोद बावणे, दिनेश भगत, प्रमोद माथनकर, राजू मंजेवार, नरेश आगलावे, ऋतुजा बावणे, सीमा चव्हाण, निकिता उघडे यांनी सहकार्य केले.(शहर प्रतिनिधी)