आर्वी : निवडणुकीचा दिनांक जवळ येत असल्याने प्रचाराच्या रणधुमाळीला आर्वी विधानसभा मतदार संघात सुरूवात झाली आहे. काँग्रेस, भाजपा यांच्या काट्याच्या लढतीत प्रहारची उमेदवारी निर्णायक ठरण्याची शक्यता आहे़ असे असले तरी सध्या कार्यकर्त्यांचा पोस्टर प्रचार मात्र सुरू झाल्याचे दिसून येत आहे़प्रहारच्या उमेदवाराने अर्ज स्वीकारण्याच्या पहिल्याच दिवशी नामांकन दाखल केले़ यामुळे निवडणुकीतील चुरस वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे़ सध्या प्रचारात दुचाकी, चारचाकी वाहनांचा वापर होत असून उमेदवारांचे फोटो मतदारांचे लक्ष वेधून घेत आहे. यात तीन पक्ष सध्या आघाडीवर असल्याचे दिसते़ सध्या कार्यकर्त्यांचा हंगाम असल्याने प्रत्येकच उमेदवार आता युवा कार्यकर्त्यांची विचारपूस करीत असल्याचे एकूण चित्र मतदार संघात पाहायला मिळत आहे. यातच इच्छुक उमेदवारांचे चित्रही पक्ष कार्यकर्त्यांच्या दुचाकी-चारचाकी वाहनांवर दिसून येत आहे़ हा पोस्टर प्रचार सध्या आर्वी विधानसभा मतदार संघात जोमाने सुरू झाल्याचे दिसते़ सध्या रहदारीच्या रस्त्यावर तसेच गावातील दुचाकी-चारचाकी वाहनांवर इच्छुकांचे छायाचित्र, पोस्टर दिसून येतात़ यावर अबकी बार..., फिर एक बार, दिलसे कहो, आर्वी की ललकार आदी घोषवाक्येही दृष्टीस पडतात़ युवा मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोबाईल, तंत्रज्ञान, इंटरनेट याद्वारे प्रचार यंत्रणा राबििवली जात असल्याचेही दिसते़ मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी कमी कालावधी असल्याने सर्वच माध्यमांचा वापर करण्याची ही शैली सर्वच मुख्य पक्षाच्या उमेदवारांनी अवलंबिल्याचे दिसते़ यामुळे मतदारांकरिताही प्रचाराचे हे प्रकार चर्चेचे विषय ठरत आहे. कमी कालावधीत अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा हा फंडा निश्चितच अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचे प्रभावी माध्यम ठरू शकते़ मतदार संघामध्ये सुरू असलेला कार्यकर्त्यांचा पोस्टर प्रचारही सध्या मतदारांना चर्चेचा ठरत असल्याचे दिसते़(तालुका प्रतिनिधी)
कार्यकर्त्यांचा पोस्टर प्रचार सुरू
By admin | Updated: September 21, 2014 23:56 IST