शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

प्रवेश करताच उमेदवारी देण्याला कार्यकर्त्यांचा विरोध

By admin | Updated: July 24, 2016 00:22 IST

नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पक्षाद्वारे संवाद यात्रा काढण्यात आली आहे.

भाजपची संवाद यात्रा : पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा सूर हिंगणघाट : नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पक्षाद्वारे संवाद यात्रा काढण्यात आली आहे. यात संत कंवरराम भवनात कार्यकर्ता संवाद यात्रेनिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. जिल्हा कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत त्यांच्याकडून विविध सूचना मागविल्या. यात पक्षात प्रवेश करताच उमेदवारी दिली जात असल्याचा कार्यकर्त्यांनी जोरदार विरोध केला. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष राजेश बकाने तर अतिथी म्हणून जिल्हा सरचिटणीस किशोर दिघे, अविनाश देव, सुनील गफाट, अतुल तराळे, नितीन मडावी, बाळा जगताप, दिनेश सुरकार, माजी नगराध्यक्ष प्रेम बसंतानी, गिरधर राठी, बिसमिल्ला खान आदी उपस्थित होते. पदाधिकाऱ्यांसोबत कार्यकर्त्यांनी संवाद साधून मनोगत व्यक्त केले. आगामी नगर परिषद निवडणुकीसाठी नगराध्यक्ष व नगरसेवकांची उमेदवारी देण्यापूर्वी जनतेतून सर्वेक्षण घेण्यात यावे, उमेदवारांची प्रामाणिकता, पक्षनिष्ठा व त्यांचे सामाजिक कार्य या महत्त्वपूर्ण बाबी लक्षात घेऊनच पक्षातर्फे उमेदवारी देण्यात यावी, असा बहुसंख्य कार्यकर्त्यांचा सूर होता. शिवाय ऐनवेळी पक्षात प्रवेश घेऊन उमेदवारी देण्याच्या धोरणाचा कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध केला. याला सरचिटणीस किशोर दिघे यांनीही दुजोरा देत ऐनवेळी पक्षात प्रवेश करणाऱ्यांना उमेदवारी देण्यात येणार नसल्याची ग्वाही दिली. बकाने यांनी नगरपालिका निवडणुकीकरिता सज्ज राहावे, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे संचालन शहर सरचिटणीस छाया सातपुते यांनी केले तर उपस्थितांचे आभार आखाडे यांनी मानले. यावेळी जिल्हा चिटणीस प्रा. किरण वैद्य, रमेश टपाले, अविनाश आईटलावार, शंकर एंकेश्वर, अ‍ॅड. रवी मद्दलवार, बळवंत वाघे, सतीश ढगे, धिरज इंदूरकर, अंकुश ठाकूर, आशिष पर्बत, दिनेश वर्मा, कलमाकर, येसनसुरे, नगरसेवक विठ्ठल गुळघाणे, शुभांगी डोंगरे, शारदा पटेल, मनीष देवळे, नीता धोबे, दिनेश वर्मा, प्रदीप जोशी, राकेश शर्मा, डॉ. उमेश तुळसकर, धिरज इंदूरकर, गणेश उगे, अनीता माळवे, कौसर अंजुम, अर्चना भोयर, वंदना धोंगे, शोभा बैसवारे, वैशाली पालांडे, गीता मेश्राम संगीता मेंढे यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)